भाजप-मनसेची युती? राज ठाकरेंच्या भेटीसाठी फडणवीस शिवतीर्थवर; काय घडले भेटीत?

November 25, 2021 , 0 Comments

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकारणही चांगलेच तापले आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या महत्त्वपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य युती होऊ शकते अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांनी मध्य मुंबईतील दादर येथील राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला यांचे नवीन घर ‘शिवतीर्थ’ येथे भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बाल्कनीमध्ये चर्चा करताना ते दिसत होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नेत्यांमधील भेटीचे वर्णन करताना कौटुंबिक भेट असे केले आहे, तर राजकीय विश्लेषकांचे मत आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण ठरू शकते.

दरम्यान, 2014 ते 2019 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी खुप चांगले संबंध ठेवले होते. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत, मुंबईतील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने 82 जागा जिंकल्या. मात्र, शिवसेनेने 84 जागा जिंकून सत्ता राखली.

गेल्या तीन दशकांपासून महापालिकेच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेवर भाजपला आता आघाडी मिळवायची आहे. गेल्या बीएमसी निवडणुकीत काँग्रेस 31 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरली होती, तर राष्ट्रवादी आणि मनसेला अनुक्रमे 9 आणि 7 जागा मिळाल्या होत्या.

एका वर्षानंतर, मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने असे चित्र दिसत आहे की की दोन्ही पक्षांमध्ये युती होऊ शकते. काही दिवसांपुर्वीच राज ठाकरे त्यांच्या कुटुंबीयांसोबत कृष्णकुंजवरून शीवतीर्थवर राहायला आले आहेत. राज यांचे नवं निवासस्थान त्यांचे जुने निवासस्थान कृष्णकुंजच्या शेजारीच आहे.

राज यांनी नवीन घरात प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिवाळील राज यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रसाद लाडसुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. लाड हे फडणवीसांच्या जवळचे मानले जातात. देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीचं कारण अद्याप कळालेलं नाही. पण जर मनसेची मदत मिळाली तर भाजपला महाराष्ट्रात फायदा होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या
सरकार म्हणतय एसटी संप मिटला, खोत पडळकरांनी आझाद मैदानावर जाताच फिरवला शब्द; म्हणाले..
..तर आम्ही एसटी संपातून बाजूला होऊ, गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट केली भूमिका
राज्य सरकारने पगारवाढ केली, आता ST संप मिटणार का? सदाभाऊ खोत म्हणाले…
Video; वीजतोडणी विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले, आमदाराचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: