शिवसेना आमदाराचा माणूसकीचा झरा! मध्यरात्री अपघातग्रस्तावर स्वत: केले उपचार

November 26, 2021 , 0 Comments

एरवी सत्तेत असलेले आमदार खासदार सर्वसामान्यांचे फोन उचलण्यासाठी टाळाटाळ करतात. औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे मात्र याला अपवाद आहेत. दानवे यांनी अनेकदा चालता चालता वाटसरूंना मदत केल्याचे किस्से पाहायला मिळाले आहेत. तस पाहिलं तर अंबादास यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे जिल्ह्यात आहे तरीदेखील एखाद्याने मदत मागितल्यास ते स्वतः मदतीसाठी हजर होतात.

नुकतीच गुरुवारी झालेली घटना आहे. दानवे यांनी स्वत:च्या गाडीतील प्रथमोपचार पेटी बाहेर काढत एका अपघात झालेल्या सायकलस्वारावर प्रथमोपचार केले आहेत. अपघातात सायकलस्वाराच्या डोक्याला चांगलीच दुखापत झाली होती.

अंबादास दानवे पुण्याकडे त्यांच्या कारने निघाले होते. अपघात झालेला असल्याची बाब लक्षात आल्यानंतर दानवे यांनी लगेच गाडी थांबवली. त्यांनी अपघातग्रस्त सायकलस्वाराची विचारपूस करुन त्याच्यावर प्रथमोपचार केले. कोणताही उशीर न करता त्यांनी आपल्या कारमधील प्रथमोपचार पेटी बाहेर काढत सायकलास्वाराला मदतीचा मोठा हात दिला.

आमदार दानवे यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियाद्वारे या घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे. तसेच वाहने जपून चालवण्याचे आवाहन देखील या निमित्ताने त्यांनी केले आहे.

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: