ड्रग्ज पार्टी: आर्यन खानसह तिघांना NCB कोठडी; 'ते' व्हॉट्सअ‍ॅप चॅट हाती

October 04, 2021 0 Comments

मुंबई: क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा याच्यासह तीन जणांची एनसीबी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या तिघांनाही किला कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान, मुंबईजवळ समुद्रात या क्रूझवर शनिवारी रात्री सुरू असतानाच एनसीबीने छापा टाकला होता व आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील आर्यन, त्याचा मित्र आणि मूनमून धामेचा या तीन जणांना चौकशीनंतर अटक करण्यात आली. ( ) वाचा: किला कोर्टात एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांची अधिक चौकशी करायची असल्याने ५ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी केली. आरोपी हे ड्रग्ज पुरवठादारांशी व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. मोबाइल फोनमधून त्याचे पुरावे मिळाले आहेत, असेही एनसीबीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. त्यानंतर अ‍ॅड. यांनी आर्यनची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आर्यन व अन्य दोघांना उद्यापर्यंत (४ ऑक्टोबर ) एनसीबी कोठडी सुनावली. वाचा: दरम्यान, आर्यनच्या वतीने आजच जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्यावर आता उद्या सुनावणी होणार आहे. नेमकं काय आहे प्रकरण? मुंबई येथून गोवा येथे जात असलेल्या कॉर्डेलिया या आलिशान क्रूझवर एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी आयोजकांनी ८० हजार ते दोन लाखांपर्यंत शुल्क आकारले होते. या हायप्रोफाइल पार्टीत ड्रग्जचा पुरवठा करण्यात आल्याची पक्की खबर एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे एनसीबीची टीम आधीपासूनच या पार्टीच्या मागावर होती. एनसीबीने आधीच सापळा रचला होता. एनसीबीने पार्टीच्या तिकीट खरेदी केल्या होत्या. त्यानंतर २२ जणांचे पथक प्रवासी बनून या क्रूझवरील पार्टीत पोहचले. शनिवारी रात्री क्रूझवर पार्टी रंगात आली असतानाच या पथकाने कारवाई करत ही पार्टी उधळली. या कारवाईत कोकेन, एमडी, चरस, गांजा असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याआधारेच शाहरुखचा मुलगा आर्यनसह ८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: