कोपर्डी प्रकरणाची उद्यापासून पुन्हा सुनावणी; जिल्हा कोर्टाने दिलीय फाशीची शिक्षा

October 04, 2021 0 Comments

: कर्जत तालुक्यातील येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाची रखडलेली सुनावणी अखेर सुरू होत आहे. मुबंई उच्च न्यायालयात सोमवारी (४ ऑक्टोबर) ही सुनावणी होणार आहे, अशी माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी होणार असून यावेळी नियमित सुनावणीच्या तारखा ठरविल्या जाण्याची शक्यता आहे. ( ) वाचा: आधी इतर तांत्रिक अडचणी आणि नंतर मुळे ही सुनावणी रखडली होती. सुनावणी सुरू करण्यासंबंधीची विनंती सरकारतर्फे अ‍ॅड. यादव यांनी सप्टेंबरमध्ये न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आता सुनावणीसाठी तारीख मिळाली आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. यामध्ये जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. जिल्हा न्यायालयात अवघ्या १६ महिन्यांत निकाल लागला. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. तीनही आरोपींना खून आणि बलात्कार या आरोपांसाठी फाशीची शिक्षा सुनावली. या फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फाशी निश्चिती करणाचा अर्ज दाखल दाखल केला होता. त्याचप्रमाणे यातील आरोपी संतोष भवाळ याने फाशीच्या शिक्षेच्या विरोधात अपील दाखल केले. यावर प्राथमिक सुनावणीनंतर २५ फेब्रुवारी २०२० पासून नियमित सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्याच काळात करोना संसर्गाचा शिरकाव झाला आणि पहिला लॉकडाऊन लागला व सुनावणी लांबणीवर पडली. आता कोर्टाचे कामकाज सुरळीत सुरू झाल्याने सरकारतर्फे ही सुनावणी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करून सोमवारी सुनावणी ठेवली आहे. त्यामध्ये पुढील नियमित सुनावणीच्या तारखा ठरविल्या जाण्याची शक्यता आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: