ड्रग्ज पार्टी: आर्यन खानसह तिन्ही आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी

October 05, 2021 0 Comments

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा याला तूर्त कोठडीतच राहावे लागणार आहे. आर्यनची ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यासोबतच त्याचा जवळचा मित्र आणि या दोघांनाही कोर्टाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी दिली आहे. ( ) वाचा: मुंबईजवळ समुद्रात क्रूझवर चाललेली उधळत एनसीबीने या तिघांनाही अटक केली होती. किला कोर्टाने रविवारी या तिघांनाही एका दिवसाची एनसीबी कोठडी दिली होती. आज या कोठडीची मुदत संपत असल्याने पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता तिघांच्याही कोठडीत वाढ करण्यात आली. आर्यन खान व अन्य दोन आरोपींची कोठडी वाढवून मागताना आज एनसीबीच्या वकिलांनी गंभीर आरोप केले. आर्यन हा गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचे पुरावे आढळले आहेत. त्याच्या मोबाइलमधून काही महत्त्वाचे फोटो आणि चॅट्स हाती आले आहेत. त्यामुळेच क्रूझवरील या पार्टीची आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी लिंक असण्याची शक्यता असून त्याबाबत चौकशी करण्यासाठी आर्यन व अन्य दोन्ही आरोपींची कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती एनसबीने कोर्टात केली. वाचा: आर्यनचे वकील सतीष मानेशिंदे यांनी एनसीबीच्या आरोपांवर आक्षेप घेतला. आर्यनच्या बॅगची तपासणी करण्यात आली पण त्यात ड्रग्ज वा अन्य कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. त्याच्याकडे बोर्डिंग पासही नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण होतं त्यामुळे तो तिथे गेला होता. त्याचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मूनमून धामेचा यांच्याकडे चरस आढळलं असलं तरी त्यासाठी आर्यनला दोषी धरता येणार नाही, असे मानेशिंदे यांनी नमूद केले. आर्यनचा ड्रग्ज खरेदी आणि विक्रीशी काहीही संबंध नसताना आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी लिंक असण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो, अशी विचारणाही मानेशिंदे यांनी केली. व्हॉट्सअ‍ॅप चॅट हा पुरावा होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. सुमारे अडीच तास हा युक्तिवाद चालला. त्यानंतर एनसीबीची विनंती मान्य करत कोर्टाने तिन्ही आरोपींना सात ऑक्टोबरपर्यंत कोठडीत पाठवले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: