नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायचंय?; अशी आहे नियमावली...

October 05, 2021 0 Comments

सोलापूर: श्री मातेच्या कालावधीत गृहविभागाने दिलेल्या सूचनेनुसार पहाटे चार ते रात्री दहा वाजेपर्यत पंधरा हजार भाविकांना घटस्थापनेपासून मंदीरात फक्त दर्शनार्थ प्रवेश दिला जाणार आहे. तसेच कोजागिरी अश्विनी पौर्णिमा कालावधी १८ ते २० ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्हाबंदी असणार आहे. त्यामुळे राज्यातील व राज्याबाहेरील भाविकांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. शारदीय नवरात्र उत्सव काळातील सर्व विधी कुलाचार हे मंहत त्या-त्या विधीचे मानकरी पुजारी यांच्या उपस्थितीत पार पाडतील, असे नमूद करण्यात आले आहे. ( ) वाचा: पूजाविधी पार पाडताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यासह शारदीय नवरात्र उत्सवाबाबत जिल्हाधिकारी यांनी अनेक आदेश जारी केले आहेत. त्याचे पालनही करावे लागणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे . परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना जिल्ह्यात प्रवेश देताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी ७२ तासाच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. यात्रा काळात कोविड नियमांचे पालन बंधनकारक असून नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदिरात ६५ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया व १० वर्षांखालील बालके यांना प्रवेश नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे २ डोस झालेले असावे व त्याची यादी प्रशासनाला कळवावी, असेही नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. वाचा: शारदीय नवरात्र उत्सवातील अश्विनी कोजागिरी पौर्णिमा दिनी पाच ते सहा लाख भाविक चालत येवून देवीचरणी आपला खेटा पूर्ण करतात पण यंदा या काळात १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान जिल्हाबंदी आहे तर शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. पौर्णिमेच्या अगोदर एक दिवस, पौर्णिमेदिवशी व पौर्णिमेनंतर एक दिवस असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी तैनात असणार आहेत. उत्सुकता अखेर संपुष्टात ! श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवात किती भाविकांना दर्शन दिले जाणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर १५ हजार भाविकांना दर्शन देण्याचे निश्चित झाल्याने ही उत्सुकता संपुष्टात आली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: