शाहरूखचा मुलगा आर्यन आता पुरता अडकला! त्याच्याविरोधात मजबूत पुरावे असल्याची NCB ची माहिती

October 04, 2021 , 0 Comments

मुंबईत झालेल्या एका क्रूझवर रेव्ह पार्टीमध्ये एनसीबीच्या टीमने छापेमारी केली. यावेळी रेव्ह पार्टीमध्ये शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानही क्रूझवर उपस्थित होता. या रेव्ह पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही क्रुझ शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गोव्याकडे निघाली होती, जिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

दरम्यान आर्यन खानला कोर्टाने एक दिवसाची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. एनसीबीकडे आरोपींविरोधात भक्कम पुरावे असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर ही कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान सोबत इतर जणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

या ड्रग्स पार्टीचा मुख्य सूत्रधार तसेच या पार्टीतील ड्रग्स पेडलर नेमका कोण आहे याचा थांगपत्ता लागावा यासाठी ही कोठडी आरोपींना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

या ड्रग्स पार्टीची माहिती एनसीबीला आधीपासूनच मिळाली होती. सापळा रचून सगळ्यांना रंगेहात पकडण्याची तयारी हा विभाग करत होता. ठरल्याप्रमाणे एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे पथक सर्च वॉरंट घेऊन पार्टीत दाखल झाले. कोणाला संशय येऊ नये म्हणून सर्व अधिकारी सध्या वेशात होते.

पार्टी सुरू होण्याच्या काही वेळेआधी एनसीबीने प्रत्येकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची झडती घेण्यात आली असता मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडले. सध्यातरी या प्रकरणात एकूण ८ जणांना ताब्यात घेतले असून त्यात आर्यन खानचा देखील समावेश आहे. तर एकूण ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहरुख खानच्या मुलाचे एका ड्रग्स पार्टीत पकडले गेल्याने पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्स रॅकेट यांच कनेक्शन समोर आले आहे. या आधी देखील सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी चौकशीत अनेक बॉलिवूड कलाकार ड्रग्स प्रकरणी अडचणीत सापडले होते. आता पुन्हा नव्याने बॉलिवूड आणि ड्रग्स यांचे घनिष्ठ संबंध असल्याचं दिसून आले आहे.

 

महत्वाच्या बातम्या
गुढ वाढले! आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा तो व्यक्ती कोण?; एनसीबी म्हणते, आमचा संबंध नाही
शाहरूखच्या पोराची आजची रात्र जेलमध्येच! भक्कम पुरावे असल्याचा NCB चा दावा
बिग बॉस विनरची झालीये आता अशी अवस्था, हॉस्पिटलमध्ये फरशी पुसतानाचा फोटो व्हायरल
मी पदावर असो किंवा नसो, कायम राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत उभा राहीन- नवज्योत सिद्धू


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: