शाहरुखच्या मुलासह ८ जणांना ताब्यात का घेतलं?; NCB प्रमुख म्हणाले...

October 04, 2021 0 Comments

मुंबई: मुंबईजवळ समुद्रात एका क्रूझवर कारवाई करत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उधळली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून पार्टीत सहभागी झालेला अभिनेता याचा मुलगा याच्यासह ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांची कसून चौकशी सुरू असतानाच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी या कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ( ) वाचा: 'क्रूझवर अशाप्रकारे ड्रग्ज पार्टी होणार असल्याची गोपनीय खबर आम्हाला १५ दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सातत्याने मागावर राहून आमच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली', असे एस. एन. प्रधान यांनी नमूद केले. एनसीबीचे २२ अधिकारी प्रवासी बनून या क्रूझवर गेले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. क्रूझवर उपस्थित १८०० जणांमधून ८ जणांनाच ताब्यात घेण्यात आले आहे. म्हणजे या आठ जणांकडे निश्चितच काही तरी सापडले असेल म्हणून ही कारवाई झाली आहे, असे प्रधान पुढे म्हणाले. या ड्रग्ज पार्टीत ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग आढळले त्या सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वाचा: अटकेची कारवाई कधी? क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा, आर्यन खान, अशा आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी कुणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. एनसीबी अधिकाऱ्यांकडून या सर्वांची सध्या कसून चौकशी करण्यात येत आहे. या सर्वांचे जबाब नोंदवण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे एनसीबीतील सूत्रांनी सांगितले. यात काही जणांकडे अमली पदार्थ सापडले असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. ही पार्टी नेमकी कुणी आयोजित केली होती. या पार्टीत ड्रग्जचा पुरवठा कुणी केला, अशा अनेक बाजूंनी एनसीबीचा तपास सुरू आहे. येथून गोव्याला हे क्रूझ निघाले होते. या क्रूझवरील पार्टीसाठी ८० हजार ते दोन लाखांपर्यंत मोठे शुल्क ठेवण्यात आले होते. त्यामुळेच या हायप्रोफाइल पार्टीबाबत तपासातून अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: