जळगाव दंगल: 'उसने हमारी बहन को छेडा है' म्हणत...

October 04, 2021 0 Comments

जळगाव: येथे खंडेरावनगरातील आझादनगर भोईवाडा परिसरात प्रेमीयुगूल फिरत असताना त्यातील तरुणीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर दगडफेक करत जखमी करण्यात आले. याचवेळी दोघा गटांनीही एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली. रात्री उशिरा २९ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ( ) वाचा: खंडेरावनगर परिसरात असलेल्या अझादनगर भागात एक प्रेमीयुगूल फिरत होते. यातील तरुणीची छेड काढल्याचे कारण पुढे करीत दो गट समोरा-समोर आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच ठाण्याचे , सुशील चौधरी व प्रवीण जगदाळे हे तीन कर्मचारी घटनास्थळी गेले. यावेळी ५० ते ६० जणांचा जमाव एकमेकांवर दगडफेक करत होता. पोलिसांनी काही वेळातच जमावात जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दानिश बालिक पिंजारी याने ‘उसने हमारी बहन को छेडा है, तुम क्यो आये’ असे म्हणत त्याने पोलिसांना शिवीगाळ केली. तर अशपाक खान, रमजान पिंजारी, रेहान शेख व समीर शेख सलीम यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. यानंतर काही सेकंदातच या परिसरात तणाव आणखी वाढला. चहुबाजूने दगडफेक सुरू झाली. अंधार असलेल्या गल्ली-बोळातून दगडफेक केली जात होती. यात गजू उत्तम चौधरी व सिराज सुपडू पिंजारी यांच्या घराच्या काचा फुटल्या. तसेच पोलीस कर्मचारी संजय सपकाळे हे जखमी झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती देऊन अधिक कुमक बोलावून घेतली. सुमारे पाऊण तास दगडफेक सुरू होती. दंगलखोरांनी पोलीस वाहनावर देखील दगड मारले. वाचा: रात्री साडेअकरा वाजता परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात आली. यांनतर सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील २९ जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दंगलखोरांची समजूत काढत असताना पोलीस कर्मचारी संजय सपकाळे यांच्यावरही दगडफेक झाली. त्यांच्या डोक्याला देखील एक दगड लागला. सुदैवाने त्यांनी हेल्मेट घातलेले असल्यामुळे दुखापत झाली नाही. पाठीत काही दगड लागल्यामुळे मुकामार बसला. पोलीस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी शनिवारी रात्री व आज रविवारी या परिसरात भेट देऊन पाहणी केली. २९ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा या दंगली प्रकरणी २९ जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी , समीर शेख, सनी उमप, बारकू भोई, लखन भोई व राम भोई या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: