मोठी बातमी! समुद्रातील ड्रग्स पार्टीवर NCB ची धाड; बॉलीवूड अभिनेत्यांच्या मुलांसह १० जण ताब्यात

October 03, 2021 , 0 Comments

मुंबई। मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर एनसीबीने छापा टाकला आहे. व या छापेमारीत काही सेलिब्रेटी तसेच त्यांची तरुण मुले यांचा समावेश असल्याचे समजते असून १० जणांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे आता यामध्ये नक्की कोणता कलाकार असणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असून संपूर्ण मनोरंजन इंडस्ट्री हादरून निघाली आहे. व आता सर्वांवर मुंबईत कारवाई करण्यात येणार आहे.

कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई बंदर सोडून दोन तास झाल्यावर या जहाजावर पार्टी सुरु झाली. ही ड्रग पार्टी सुरु होताच, जहाजावर दबा धरुन बसलेल्या एनसीबीने पार्टी उधळली. एनसीबीचे झोनल अधिकारी समिर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही धाड टाकण्यात आली.

या सर्व प्रकरणात उशीरापर्यंत कारवाई सुरु असून, यातून एक मोठ ड्रग रॅकेट समोर येण्याची शक्यता असल्याचं एनसीबी सुत्रांकडून समजत आहे. एनसीबीने धाड टाकल्यानंतर अनेक व्हिडिओज व फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.

पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. NCB चे पथक मागील २० दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते. व आता सापळ्यात अडकलेल्या १० जणांनवर मुंबईत पुढील कारवाई केली जाणार असून हे दहा जण कोण? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

दुख:द! वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांच्या प्रतिमेला हार घालताना माजी आमदाराचे हार्ट अटॅकने निधन

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, घरही भाड्याचं; २१ हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणात दाम्पत्याला अटक, पोलिसही चक्रावललॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, घरही भाड्याचं; २१ हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणात दाम्पत्याला अटक, पोलिसही चक्रावले

तरुणाने भंगारातून बनवला आयरन मॅनचा सुट; आनंद महिंद्रांनीही केले कौतुक, मग केले असे काही.., पहा व्हिडीओ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: