NCBने क्रुझ पार्टीत सापडलेल्या भाजप नेत्याच्या मेहूण्याला सोडून दिले? NCB म्हणतय की…

October 10, 2021 , 0 Comments

मुंबईच्या समुद्रात क्रुझवरील पार्टीवर छापा पुर्णपणे बनावट आणि एका योजनेद्वारे करण्यात आला असून आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्यासारख्या हायप्रोफाईल आरोपींना भाजपचे पदाधिकारी पकडून ओढत नेत होते, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

त्यानंतर पुन्हा एकदा नवाब मलिकांनी पत्रकार परीषद घेत अनेक गंभीर आरोप भाजवर केले आहे. एनसीबीने ज्या दोघांना सोडले त्यात भाजप नेत्याचा मेहूणा असल्याचे नवाब मलिकांनी म्हटले आहे. नवाब मलिकांच्या गंभीर आरोपांनी एकच खळबळ उडाली होती.

या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी असेही म्हटले होती की एनसीबीने खुलासा करावा की नक्की त्यांनी या प्रकरणात किती जणांना पकडले होते. यावेळी मलिकांनी दहा जण एनसीबीने पकडले होते, पण दोन जणांना सोडण्यात आले असा गंभीर आरोप एनसीबीवर केला होता.

आता या प्रकरणावर एनसीबीने प्रतिक्रिया दिली आहे. एनसीबीने नवाब मलिकांचा तो आरोप फेटाळला आहे. एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन हा दावा फेटाळला आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह आणि मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे आरोप करण्यात आले आहे, ते निराधार आहे. एका निष्पक्ष यंत्रणेवर असे आरोप करणे ही खेदाची बाब आहे. एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी जो छापा टाकला होता, तो नियमांनीच केला होता. या प्रकरणात चौकशीनंतरच आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटले आहे.

एनसीबी ही व्यवसायिकपणे काम करणारी तपास यंत्रणा आहे. आमच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे क्रुझवर छापा टाकला. यात एकूण १६ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर चौकशीत ज्यांच्याबाबत कोणताही पुरावा आढळला नाही, त्या ८ जणांना सोडण्यात आले होते, तर ज्या जणांविरोधात पुरावे आढळले, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटले आहे.

तसेच नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप खोटे आहे. भाजपशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडण्यात आलेले नाही. व्यक्ती कोण आहे हे पाहून एनसीबी काम करत नाही, असेही ज्ञानेश्वर यांनी म्हटले आहे.

तसेच या कारवाईत एकूण ९ पंच साक्षीदार होते, त्यात मनीष भानूशाली आणि के पी गोसावी यांचाही समावेश होता. हे पंच कारवाईवेळी आमच्या पथकासोबत होते, असेही ज्ञानेश्वर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

आर्यनला झाली अटक अन् शाहरुखलाच बसला कोटींचा झटका; ‘या’ प्रसिद्ध कंपनीने शाहरुखशी तोडले संबंध
ड्रग्ज पार्टीत भाजप युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष होता व त्याला NCBने सोडून दिले? फडणवीसांनी केला ‘हा’ खुलासा
जेआरडी टाटांच्या त्या वक्तव्यानंतर एअर इंडियाच्या एअर होस्टेस स्कर्टवरून साडीवर आल्या होत्या


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: