आर्यनला झाली अटक अन् शाहरुखलाच बसला कोटींचा झटका; ‘या’ प्रसिद्ध कंपनीने शाहरुखशी तोडले संबंध
मुलगा आर्यन खानला मुंबईतील एका ड्रग प्रकरणात अटक केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. मुलगा आर्यनच्या अटकेनंतर आता एका मोठ्या ब्रँडने शाहरुखसोबत झालेला करार संपवल्याचे वृत्त समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वीच ब्रँडने शाहरुख खानला एडव्हांस पेमेंट दिला होता. असे असतानाही ब्रँडने शाहरुखच्या जाहिराती बंद करण्याची घोषणा केल्याचे माहिती समोर आली आहे. हा शाहरुखचा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता.
द इकॉनॉमिक टाइम्स मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, एडटेक स्टार्टअपने गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याच ट्रोलचा सामना केल्यानंतर, आगाऊ बुकिंग असूनही शाहरुख खानच्या जाहिराती परत घेतल्या आहेत. बातमीनुसार, बायजूच्या प्रवक्त्याने यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितले की, शाहरुख खानने बायजूसोबत केलेल्या कराराचे वार्षिक चार्ज ३ ते ४ कोटी रुपये निश्चित केला आहे. शाहरुख खान २०१७ पासून कंपनीचा ब्रँड ऍम्बेसेडर आहे आणि तो जॉईन झाल्यापासून या कंपनीची खूप वाढ झाली आहे.
बायजूने शाहरुखशी संबंधित सर्व जाहिराती सध्या बंद केल्या आहेत. कारण शिक्षण क्षेत्रात काम करणारी कंपनी शाहरुख खानचा वाद पाहत आहे. त्यामुळे कंपनी त्याच्यासोबत मिळून प्रमोशन करु शकत नाही. बायजूने शाहरुखला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून सोडण्याचा निर्णय घेतला आहे की नाही हे स्पष्ट नाही, असे सूत्राने सांगितले. पण शाहरुखच्या सर्व जाहिराती सध्या थांबवण्यात आलेल्या आहे.
एफसीबी इंडियाचे क्रिएटिव्ह ऍड एजन्सी ग्रुपचे चेअरमन रोहित ओहरी म्हणाले, सध्याच्या वादामुळे बायजू आपला ब्रँड वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण सेलिब्रिटींच्या जाहिराती नेहमीच जोखमीसह येत असतात.
महत्वाच्या बातम्या-
ड्रग्ज पार्टीत भाजप युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष होता व त्याला NCBने सोडून दिले? फडणवीसांनी केला ‘हा’ खुलासा
किरण गोसावी हा फरारी आरोपी, पुण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा; गृहमंत्र्यांची माहिती
तारक मेहता… मालिकेत पुन्हा होणार ‘या’ जुन्या कलाकाराची एंट्री; स्वत:च दिली हिंट, चाहतेही झाले खुश
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: