Helmet Gang: अशी अडकली गुजरातची ‘हेल्मेट गँग’ अहमदनगर पोलिसांच्या जाळ्यात

October 27, 2021 0 Comments

अहमदनगर: बँकेच्या बाहेर पाळत ठेवून पैसे काढून निघालेल्या ग्राहकांच्या हातातील बॅग हिसकावणारी आंतरराज्य टोळी अहमदनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनीही पाळत ठेवून आणि बँकेबाहेर सापळा रचून ही कारवाई केली. गुजरातमधील आरोपी असलेल्या या टोळीला ‘’ म्हणून ओखण्यात येते. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा चार राज्यांत या टोळीविरूद्ध २५ गुन्हे दाखल आहेत. (see this is how gujarats was caught by the ahmednagar police) या टोळीतील जिग्नेश दिनेश घासी (वय ४२), अजय उत्तम माचरेकर (वय ४५), राकेश बन्सी बंगाली (वय ४५), दीपक भिका इंदरेकर (वय ३०), मयुर दिनेश बजरंगे (वय ३३) व राजेश हरीयाभाई तमायचे (वय ४९, सर्व राहणार अहमदाबाद, गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- बॅगा चोरणारी टोळी नगरमध्ये आल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. ही टोळी चलाखीने गुन्हे करीत असल्याने आणि पळून जाण्यात यशस्वी होत असल्याने पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडण्याची योजना आखली. त्यासाठी पोलिसांनीही बँकेबाहेर पाळत ठेवण्यास सुरवात केली. नगर शहरातील बसस्थानकाजवळील एका बँकाजवळ पोलिसांना सापळा रचला. हेल्मेट घालून चोऱ्या करण्याची टोळीची पद्धत पोलिसांना माहिती होती. त्या दृष्टीने पोलिसांनी लक्ष ठेवले आणि गुन्हा करताना आरोपींना पकडले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आधीच सावध होते. त्यामुळे काही अंतरावरच सहा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सुरवातीला आरोपींनी सराईतपणे उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्यांची माहिती दिली. क्लिक करा आणि वाचा- त्यांच्याकडून पोलिसांनी तीन दुचाकी वाहने, मोबाईल, हेल्मेट, स्क्रू ड्राइव्हर, डिक्की खोलण्याचे साधन असा मुद्देमाल जप्त केला. या टोळी विरोधात पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, या राज्यांमध्येही दरोडा, जबरी चोरीचे २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, डीवायएसपी संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली आणि तोफखाना पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. काही पोलिस साध्या वेषात बँकेजवळ थांबले होते. तर वाहने आणि इतर पोलिस काही अंतरावर थांबून होते. आरोपी पकडले जातात सर्व पथकांनी तेथे धाव घेतली आणि आरोपींना वाहनातून पोलिस ठाण्यात आले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: