लहान मुलांना घेऊन मोटारसायकवर प्रवास करताय? जरा थांबा, सरकारने आणलाय नवा नियम

October 27, 2021 , 0 Comments

तुम्हीही तुमच्या मुलांसोबत मोटरसायकलने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटरसायकलवर मुलांना बसवण्याबाबत नवीन नियमांचा मसुदा जारी केला आहे. सुरक्षेच्या तरतुदींशी संबंधित या नियमांनुसार, 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बाइकवरून प्रवास करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.

गडकरींनी ट्विट करून ही माहिती दिली
मंत्रालयाने जारी केलेल्या या मसुद्याची माहिती देताना केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले की, मंत्रालयाने चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोटारसायकलवर नेण्यासाठी नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गडकरींनी बाईकच्या ड्रायव्हरसोबत मुलाला अटॅच करून ठेवण्यासाठी सुरक्षा उपकरणे वापरण्याबाबत सांगितले आहे.

तसेच, मुलांनी क्रॅश हेल्मेट अनिवार्य असणार आहे. या नियमांव्यतिरिक्त, 4 वर्षाच्या मुलाला घेऊन जाणाऱ्या मोटारसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटरपेक्षा जास्त नसावा असेही सांगण्यात आले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुद्यात अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत.

या शिफारशींनुसार, चार वर्षांखालील मुलांना मोटारसायकलस्वाराशी जोडण्यासाठी सुरक्षा उपकरणे वापरली जातील. ड्रायव्हरने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याच्या मोटारसायकलवर मागे बसलेल्या 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलाने क्रॅश हेलमेट घातलेले असावे जे त्याच्या डोक्यात फिट बसलेले असावे. तसेच, हेल्मेट हे ISI कायदा 2016 नुसार ठरवून दिलेल्या निकषांनुसार बनलेले असावे.

मसुद्यात असे नमूद करण्यात आले आहे की मोटरसायकल चालकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घेऊन जाण्यासाठी ‘सेफ्टी हार्नेस’ वापरला जाईल. सेफ्टी हार्नेस हे लहान मुलाने परिधान केलेले जॅकेट असते, जे आकारात बदल करता येतो. त्या सेफ्टी जॅकेटला जोडलेले पट्टे ड्रायव्हरलाही त्याच्या खांद्याला लावता येतील अशा पद्धतीने बसवले आहेत.

दुचाकीचा वेग किती असावा?
नवीन मसुद्याच्या नियमाची शिफारस करताना, चार वर्षापर्यंतच्या मुलाला घेऊन जाणाऱ्या मोटारसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटरपेक्षा जास्त नसावा, असेही म्हटले आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 मध्ये मोटार व्हेईकल कायदा 2019 द्वारे सरकारच्या वतीने आधीच सुधारणा करण्यात आली आहे.

कायद्याच्या या कलमातील दुसरी तरतूद अशी आहे की, केंद्र सरकार, नियमांनुसार, जे मोटारसायकल चालवत आहेत किंवा घेऊन जात आहेत त्यांच्या चार वर्षांखालील मुलांच्या सुरक्षेची तरतूद करू शकते. या तरतुदीचा आधार घेत सरकारने मुलांच्या सुरक्षेबाबत हा नवा मसुदा नियम जारी केला आहे, जरी तो केवळ मसुदा असला तरी त्याला लवकरच नियम म्हणून घोषित केले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या
विराटहट्टापायी ‘या’ दोन खेळाडूंना खेळवले, त्यामुळेच भारताचा पराभव; माजी क्रिकेटपटू स्पष्टच बोलला
‘खाना’वळीच्या वर्चस्वाला सुरूंग! सलमान पाठोपाठ ‘ती’ कारमधून उतरली पण त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही
समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडेच, नवाब मलिकांनी सादर केला आणखी एक पुरावा
ड्रग्ज केसमधील साक्षीदार किरण गोसावीचा पुणे पोलीसांना पुन्हा चकवा; लखनौमधूनही फरार


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: