फरार किरण गोसावी अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई होणार?

October 28, 2021 0 Comments

पुणेः मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान (aryan khan drug case) प्रकरणातील एनसीबीचा पंच साक्षीदार किरण गोसावीला (Kiran Gosavi) पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. () आर्यन खान प्रकरणानंतर चर्चेत आला होता. परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावीवर होता. मात्र, आर्यन खान प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यापासून तो फरार होता. पुणे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. एनसीबीचा दुसरा पंच प्रभाकर साईल यांनं केलेल्या आरोपांनतर गोसावी माध्यमांसमोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा किरण गोसावीचा शोध घेण्यास सुरुवात केली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत किरण गोसावीनं तो लखनऊमध्ये असल्याचं म्हटलं होतं. तसंच, मी लखनऊ पोलिसांनी शरण जाण्यासही तयार असल्याचं तो बोलला होता. मात्र, लखनऊ पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी किरण गोसावीला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झालं होता. त्यानंतर आज त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाचाः पुणे पोलिसांनी आज किरण गोसावीला ताब्यात घेतलं आहे. तसंच, आजच त्याला कोर्टात हजर करणार असल्याची माहिती आहे. तसंच, पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनकडून त्याच्या अटकेची कारवाई होऊ शकते, अशी शक्यता आहे. दरम्यान, प्रभाकर साईल हा खोटं बोलत असून त्याचे सीडीआर अहवाल तपासावे, अशी माझी विनंती आहे. माझे, प्रभाकर साईल व त्याच्या भावाचे सीडीआर व चॅट तपासावे सगळं सत्य समोर येईल, असं किरण गोसावी यांनं म्हटलं होतं. तसंच, महाराष्ट्रातील एक मंत्री किंवा विरोधी पक्षातील एखाद्या तरी नेत्यांनं माझ्या बाजूने उभे राहावे. त्यांनी मुंबई पोलिसांना सीडीआर व चॅट तपासण्याची विनंती करावी. एकदा का अहवाल समोर आला की सगळं सत्य समोर येईल, असा दावा किरण गोसावीनं केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: