व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे तोंड कापावे लागले त्याच्या..,तुषार भोसलेंची जीभ पु्न्हा घसरली

October 28, 2021 , 0 Comments

मुंबई | 2 ऑक्टोबरला रात्री एनसीबीनं मुंबईजवळ एका क्रूझवर ड्रग्ज पार्टीप्रकरणी कारवाई केली आणि काही जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्यांमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश होता. आर्यनची सुटका अजूनही झालेली नाही. या प्रकरणाला रोज नवीन वळणे मिळत आहेत.

रोज अनेक अभिनेते, अभिनेत्र्या, राजकीय नेते यावर भाष्य करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष नेत्यांमध्ये रोज वाद सुरूच आहेत. हे प्रकरण आता शाहरुख खान किंवा आर्यन खान राहिलं नसून समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लिम इथपर्यंत येऊन पोहचलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा करत आहेत. वानखेडे यांच्या जातीचा दाखला, मॅरीज सर्टीफिकेट अशी सगळी कागदपत्रे मलिकांनी ट्वीट करत आणि पत्रकार परिषदा घेत जनतेसमोर मांडली आहेत. या सर्व प्रकरणावरुन आता भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

तुषार भोसले यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की “व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षाचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल? वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है! असे ट्विट तुषार भोसले यांनी केलं आहे.

https://twitter.com/AcharyaBhosale/status/1453295662947356673?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1453295662947356673%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

तुषार भोसलेंनी एकाच दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवर धक्कादायक आरोप केले होते. त्यांनी काही पुराव्यानिशी समीर वानखेडे आणि त्यांची कारवाई कशी खोटी आहे हे दाखवले होते.

परंतु समीर वानखेडेंनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतरही अनेक आरोप पुराव्यानिशी मलिक करत आहेत. समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात जाऊन साक्ष दिली आणि आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. वानखेडे काल सकाळी दिल्लीला दाखल झाले आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: