मोठी बातमी: आर्यन खानला अखेर जामीन; आज सुटका नाही, कारण...

October 29, 2021 0 Comments

मुंबई: प्रकरणात अखेर अभिनेत याचा मुलगा याला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून आर्यन याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यनचा मित्र आणि यांनाही न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी जामीन मंजूर केला असून तिघांनाही हायकोर्टाने विशेष अटी घातल्या आहेत. याबाबतचा सविस्तर आदेश नंतर उपलब्ध होईल, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. दरम्यान, जामीन आदेशाची प्रत उद्याच उपलब्ध होणार असल्याने आर्यन खानला आजची रात्रही आर्थर रोड तुरुंगातच काढावी लागणार आहे. ( ) वाचा: आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर या तिघांनीही मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. तिघांच्याही जामीन अर्जांवर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. मंगळवार आणि बुधवारी ही सुनावणी अपूर्ण राहिली. त्यानंतर आज ही सुनावणी पूर्ण झाली. एनसीबीच्या वतीने अनिल सिंग यांनी आज युक्तिवाद केला. त्यानंतर आर्यनच्या वतीने मुकुल रोहतगी यांनीही म्हणणे मांडले. त्यानंतर कोर्टाने काही विशेष अटी घालत तिघांनाही जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तिघांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३ ऑक्टोबर रोजी या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रथम एनसीबी कोठडीत तर नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. वाचा: अटकेनंतर २६व्या दिवशी जामीन एनसीबीच्या २२ अधिकाऱ्यांच्या पथकाने २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकून ड्रग्ज पार्टी उधळली होती. या कारवाईत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी चौकशीनंतर सर्वप्रथम या तिघांना व नंतर अन्य पाच जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात रोज नवी माहिती पुढे येत असताना आर्यन, अरबाज व मूनमून याची जामिनासाठी धडपड सुरू होती. आर्यनसाठी सतीश मानेशिंदे, अमित देसाई आणि आता मुकुल रोहतगी हे बाजू मांडत होते. या सर्वातून आज अखेर २६ व्या दिवशी आर्यनला जामीन मंजूर झाला. जामीन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर उद्या किंवा पर्वा आर्यनची आर्थर रोड तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: