“शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच आज महाराष्ट्र बंद”

October 11, 2021 , 0 Comments

मुंबई। उत्तर प्रदेशाच्या लाखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात हा बंद पुकारण्यात आला असून आता याचे कारण सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसेच या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये सर्वानी अन्नदात्या शेतकऱ्यासाठी सहभागी व्हावं यासाठी आवाहन केलं जातं आहे. आज मध्यरात्रीपासून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात झाली आहे. देशभरात नवरात्री जागवल्या जात आहेत. कोरोना काळात धार्मिक उत्सव, सण साजरे करण्यावर कठोर निर्बंध सुरू आहेत, पण शेतकऱ्यांवरील अन्यायावर कोणतेच निर्बंध दिसत नाहीत.

बेबंद, बेफामपणे शेतकऱ्यांना चिरडणे-भरडणे आणि ठार मारणे सुरूच आहे. हा जुलूम आहे, दडपशाही आहे. लखीमपूर खेरीत मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले. या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. याविरोधात देशभरात संतापाच्या ठिणग्या उडत आहेत.

लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केला आहे,” असं लेखात म्हटलं आहे.
चारशेवर आंदोलक शेतकऱ्यांचे बलिदान “शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी आजच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच या बंदचा पुकारा आहे. त्यामुळे इतर राज्यांनीही या बंदचे अनुकरण केलेच पाहिजे. लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्ला हा देशातील शेतकऱ्यांवरील हल्ला आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा ज्या देशाचा आत्मा आहे, तो आत्माच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे.

दोन वर्षांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघर्ष करतो आहे. गाझीपूरच्या सीमेवर तो ऊन, वारा, पावसात बसला आहे. या काळात चारशेवर आंदोलक शेतकऱ्यांचे बलिदान झाले. या सगळय़ांवर कडी म्हणजे लखीमपूर खेरीची भयंकर घटना आहे.प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा…”लखीमपूर खेरी भागाचे खासदार अजय मिश्रा हे आज केंद्रात गृहराज्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात नऊ साखर कारखाने आहेत.

त्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसेच बुडवले तेव्हा गरीब शेतकरी भाजपा खासदारांच्या दारात उभे राहिले. शेतकऱ्यांचे काहीएक ऐकून न घेता उलट शेतकऱ्यांनाच धमकावले गेले. तरीही शेतकरी आंदोलनास उतरला, तेव्हा मंत्रिपुत्राने त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार केले.

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने विरोधी पक्षांना घटनास्थळी पोहोचू दिले नाही. प्रियंका गांधींना तर अटक केली, अपराधी मंत्रिपुत्रास अटक केलीच नाही. प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा शेतकऱ्यांचे खून करणाऱ्या मंत्रिपुत्रास सन्मानाने बोलावून अटक केली. अशी या देशातील कायदा-सुव्यवस्थेची कर्मकहाणी,” असं म्हणत लखीमपूर घटनेचा निषेध करण्यात आलाय.

वरुण गांधींना शिक्षा केली…”शेतकऱ्यांचे कोणी ऐकायला तयार नाही. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, देशाचे कृषिमंत्री यावर साध्या संवेदना व्यक्त करू शकले नाहीत. कृषिमंत्र्यांनी तरी तत्काळ लखीमपूर खेरीत पोहोचायला हवे होते. ते गेले नाहीच. उलट तेथे जाणाऱ्यांना रोखून ठेवले. भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांनी लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या घटनेचा धिक्कार केला?

भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी हे एकमेव अपवाद. त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला. शेतकऱ्यांशी असे निर्घृणपणे वागता येणार नाही, असे सांगण्याची हिंमत दाखवली. तेव्हा श्री. गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी या दोघांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळून शिक्षा केली गेली,” असं लेखात म्हटलंय. तसेच असे अनेक विषय मांडण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बिग बॉसच्या घरातून अरुण गवळीच्या जावयाची हकालपट्टी; घरातील सदस्यांना अश्रू अनावर

नोरा फतेहीचा स्विमिंगपूलमधला बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ झाला लीक; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

आर्यन खान आता पुरता अडकला! आर्यनविरोधात NCB ला मिळाला ‘हा’ भक्कम पुरावा

पंजाब जिंकल्यानंतरही ट्रोल झाली प्रिती झिंटा; ट्रोलर्स म्हणाले, कधीपर्यंत असं चालणार आहे? आम्हाला ट्रॉफी हवीये

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: