‘एक नेते उठले आणि काय भाषण केले विचारूच नका, मग मुख्यमंत्र्यांनी पार बाभळीचीच उपमा दिली’  

October 11, 2021 , 0 Comments

पुणे । दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनात मोठे शाब्दिक वाद झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भर सभेतच शाब्दिक युद्ध रंगले. यामुळे राज्यात याची मोठी चर्चा रंगली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुन्हा एकदा नारायण राणे यांची खिल्ली उडवली होती.

‘सिंधुदुर्गच्या एका नेत्याने जे काही भाषण केले पार विचारायची सोय नाही. मग उद्धव ठाकरे काय गप्प बसतील. त्यांनीही जशास तसे उत्तर दिले. पार बांभळीची उपमा दिली, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी अजित पवार जास्त काही बोलले नाहीत. मात्र उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा चांगलाच समाचार घेतला. याच्या अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत होत्या.

असे असताना बारामतीत झालेल्या एका सभेत अजित पवार यांनी राणे यांचा चांगलाच समाचार घेतला. यामुळे याची चर्चा रंगली आहे. लोकांच्या पुढे काय काम केले हे सांगायचे असते. सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळाचे लोकार्पण झाले. पण तिथेही तोच प्रकार घडला.

मी त्या ठिकाणी विकासावर बोललो. ते विमानतळ एकट्या दुकट्याने तयार करण्याचे काम नाही. यासाठी सगळ्यांनी पाठपुरावा केला आहे. 25 वर्षांपूर्वी विमानतळाचं भूमिपूजन झालं. हा आनंदाचा क्षण होता, सर्वांनी आनंदात सहभागी होण्याचे काम होते. मात्र तसे झाले नाही, असेही अजित पवार म्हणाले.

एक नेते उठले आणि आणि भाषण हाणलं की विचारायची सोय नाही. ते भाषण झाल्यावर मग मुख्यमंत्री तरी कसे गप्प बसतील. त्यांनी त्याला जशास तसं उत्तर दिलं पार बाभळीची उपमा दिली, असे अजित पवारांनी म्हणताच एकच हशा पिकला.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: