आई प्रियकरासोबत फरार, आणि मुलीने मुलाच्या वडिलांशी केले लग्न, कारण ऐकून वाटेल आश्चर्य…
प्रेमाच्या बाबतीत आपण अनेक गोष्टी बघत असतो. ब्रिटनमधील एका नात्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका महिलेचा प्रियकर तिच्या आईसोबत फरार झाला. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. यानंतर तिने प्रियकराच्या वडिलांसोबत लग्न केल्याची घटना घडली आहे.
मला आपल्या प्रियकराच्या वडिलांना दु:खात पाहायचे नव्हते. ती त्यांना आनंदी ठेवण्यासाठी काहीही करायला तयार आहे, असेही तिने सांगितले आहे. महिला म्हणाली की, माझ्या प्रियकाराच्या आईचे निधन झाले आहे. यामुळे मी त्याच्या वडिलांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे माझ्या प्रियकराला पुन्हा आई मिळाली. असे असले तरी या महिलेचे कौतुक केले जात आहे, काहींनी मात्र या नात्यावर यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणाची मात्र सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अनेकांनी तिला खोटे ठरवले असून काहींनी तिला समर्थन देखील केले आहे.
याबाबत माहिती अशी की, २४ वर्षांची गर्भवती जेस एल्ड्रिजचा प्रियकर रयान शेल्टन हा महिलेच्या आईसोबत फरार झाला होता. यानंतर शोधाशोध सुरू झाली. नंतर मात्र जेसने रयानचे वडील ग्लूस्टरशायर यांच्यासोबत लग्न केले.
जेसला आधीपासूनच आई आणि प्रियकरामध्ये संबंध असल्याचा संशय होता. नऊ महिन्यांनंतर जेव्हा जेस रुग्णालयातून बाळाला जन्म देऊन घरी परतली तर रयान आईसह फरार झाला होता. जेसला याचा मोठा धक्का बसला. यामुळे ती एकदम शांत झाली होती.
याबाबत जेस म्हणते मला वाईट वाटते की, आईने अद्याप मला सॉरीदेखील म्हटलेले नाही. यामुळे तिची सगळीकडे बदनामी झाल्याचे बोलले जाते, मात्र तिने याबाबत आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे सांगितले आहे. हे प्रकरण आपले वैयक्तिक असल्याचे तिने सांगितले आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: