ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या मुनमुन धमेचाचे काय आहे बॉलिवूड कनेक्शन? सेलिब्रिटींसोबतचे फोटो होताय व्हायरल

October 06, 2021 , 0 Comments

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अलीकडेच क्रूज ड्रग पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटला अटक केली आहे. हे सर्वजण कॉर्डेलिया क्रूझच्या जहाजावर ड्रग पार्टी करत होते.

अटक केल्यानंतर एनसीबीने अरबाज आणि मुनमुन यांच्याकडून ड्रग्सही जप्त केली आहेत. आर्यन, मुनमुन आणि अरबाजसह आठ जणांना या छापेमारीत ताब्यात घेण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून प्रत्येकजण गुगलवर यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शाहरुख खानचा मुलगा सर्वांना माहीत आहे. पण मुनमुन धमेचा बद्दल अनेकांना माहित नसल्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे.

मुनमुनवर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप आहे. एवढेच नाहीतर सोशल मीडियावर आता तिचे अनेक फोटोही व्हायरल होत आहे. तिचा बॉलिवूडशी संबंध असून तिचे बॉलिवूड सेलिब्रींटीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुनमुन धमेचा ही एक फॅशन मॉडेल आहे. ती एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. ३९ वर्षीय मुनमुनला एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. मुनमुन धमेचा ही मूळची मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहेत. मुनमुनच्या आईवडिलांचे निधन झाले असून तिचा भाऊ दिल्लीत एक मोठा व्यवसायिक असून ती आपल्या भावासोबतच राहते.

मुनमुन धमेचा ही सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. अनेकदा ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पार्टीचे फोटो पोस्ट करताना दिसत असते. तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत तिचे फोटो शेअर केले आहे.

मुनमुन धामेचाने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. NCB ने मुनमुन धामेचावर ड्रग्सचे सेवन आणि विक्री केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास अजून सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

आमच्या मुलांना बर्गर खायला द्या, ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या पालकांची अजब मागणी
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेली शिवलीला दुसऱ्याच क्षणी कीर्तन करण्यास सज्ज कशी? फोटो घालतोय धुमाकुळ
हिने वर पण काही घातलं असतं, तर बरं झालं असतं; टॉपलेस व्हिडिओमुळे मोहम्मद शमीची बायको झाली ट्रोल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: