समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबई पोलिस करताय चौकशी; जाणून घ्या काय-काय झालं आतापर्यंत….

October 29, 2021 , 0 Comments

मुंबई पोलिसांच्या एसीपी अधिकाऱ्याने बुधवारी एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध खंडणी व इतर मुद्द्यांवर आरोपांची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. वानखेडे यांच्याविरोधात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात चार तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांच्या देखरेखीखाली हा तपास सुरू आहे.

एनसीबी प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर सेल, अधिवक्ता सुधा द्विवेदी, कनिष्क जैन आणि नितीन देशमुख यांनी दाखल केलेल्या चार तक्रारी पोलीस तपासत आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. मुंबई पोलिसांनी वानखेडेविरोधात आलेल्या चारही तक्रारी एकत्र केल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. या चारही तक्रारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्या आहेत.

अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण विभाग) दिलीप सावंत तपासाचे पर्यवेक्षण करतील आणि डीसीपी हेमराजसिंग बागुल हे पर्यवेक्षक अधिकारी म्हणून त्यांना मदत करतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. सहायक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले, पोलिस निरीक्षक अजय सावंत, सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत केरकर आणि पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवळी हे तपास पथकात असतील.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर, त्याच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडेंविरुद्ध दक्षता चौकशी सुरू झाली आहे. एनसीबीच्या पाच सदस्यीय दक्षता तपास पथकाने बुधवारी मुंबईत पोहोचून वानखेडेंचा जबाब नोंदवला.

एनसीबीचे उपमहासंचालक (उत्तर विभाग) ज्ञानेश्वर सिंग, जे वानखेडेविरुद्ध दक्षता तपासाचे नेतृत्व करत आहेत, म्हणाले की त्यांच्या पथकाने दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील विभागाच्या कार्यालयातून काही कागदपत्रे आणि रेकॉर्डिंगही जप्त केले आहेत. या तपासाशी संबंधित सर्व साक्षीदारांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवले जातील, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे वानखेडे क्रूझ ड्रग्जचा तपास सुरू राहणार की नाही, यावर सिंग यांनी काहीही सांगितले नाही.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे हिंदू की मुस्लिम यावरून बुधवारी वाद आणखी वाढला. वानखेडे यांच्या जन्म प्रमाणपत्रानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आता त्यांचा निकाहनामा प्रसिद्ध केला आहे. निकाह करणार्‍या काझींनीही याची साक्ष दिली आहे.

यावर प्रतिक्रिया देत समीर वानखेडे यांनी ते मान्य केले पण त्याचवेळी त्यांनी कधीही धर्म बदलला नाही, ते नेहमीच हिंदू असल्याचा दावा त्यांनी केला. समीर वानखेडे यांचा विवाह त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी झाला होता. मलिकांनी या लग्नाचा निकाहनामा ट्विट करून त्यात लिहिले, या लग्नात समीरचे नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले आहे.

२००६ मध्ये, गुरुवार, ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता, समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा विवाह लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे झाला. दुसऱ्या ट्विटमध्ये मलिक यांनी लिहिले की, निकाहमध्ये मेहर म्हणून ३३ हजार दिले गेले. यात दुसरा साक्षीदार अजिज खान होता जो वानखेडेची बहीण यास्मिनचा नवरा आहे.

मलिक यांनी यापूर्वी वानखेडेंचा जन्म दाखला जारी करून बनावट मार्गाने नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता, तो अजूनही कायम आहे. मलिक म्हणाले, मला वानखेडे यांचा धर्म उघड करायचा नाही, तर त्यांनी आयआरएसची नोकरी मिळवून एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या अधिकारांवर गदा आणली.

मलिक आणि काझी यांच्या दाव्याला उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले, त्यांनी त्यांच्या दिवंगत आईच्या इच्छेनुसार मुस्लिम रितीरिवाजांनुसार (२००६ मध्ये) लग्न केले होते. धर्मनिरपेक्ष देशात आपल्या आईची इच्छा पूर्ण करणे गुन्हा नाही. मला माझ्या देशातील धर्मनिरपेक्षतेचा अभिमान आहे. माझी आई मुस्लिम आणि वडील हिंदू. मी त्या दोघांवर खूप प्रेम करतो. पण मी कधीही इस्लाम स्वीकारला नव्हता, मी हिंदू आहे.

पहिल्या लग्नाची विशेष विवाह कायद्यांतर्गत महिनाभरात नोंदणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष विवाह कायद्यांतर्गत घटस्फोटाची प्रक्रियाही पूर्ण झाली. त्याची पत्नी क्रांती रेडकर यांनीही दावा केला की, समीरने कधीही धर्म बदलला नाही आणि त्यांचे लग्नही स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत नोंदवले गेले.

समीर वानखेडेचे लग्न लावणारे काझी मुझम्मील अहमद यांनीही पुढे येऊन वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केला. काझी म्हणाले, त्यांच्या वडिलांनी मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात लग्नासाठी मला संपर्क केला होता. समीर दाऊद वानखेडे असे या वराचे नाव असून त्याचा शबाना कुरेशीशी विवाह झाला होता. शरियतनुसार गैर-मुस्लिम विवाह करता येत नाही.

लग्नादरम्यान समीर वानखडे याने स्वतःला आणि वडिलांना मुस्लिम असल्याचे जाहीर केले होते. म्हणूनच मी लग्न लावून दिलं. साक्षीदारांनीही इस्लामच्या रितीरिवाजानुसार निकाहनाम्यावर सह्या केल्या. इतकेच नाही तर निकाहनाम्यात उर्दू भाषेत केलेल्या सह्याही वानखेडे यांच्याच आहेत. लग्नात मेहरच्या रुपात ३३ हजार रुपये दिले होते, असे काझींनी म्हटले आहे.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी धर्माच्या वादात मुलाचा बचाव करताना म्हटले की, मी दलित आहे, माझे पूर्वज (आजोबा) हिंदू आहेत, मग माझा मुलगा मुस्लिम कसा असू शकतो. होय, मी आंतरजातीय विवाह केला पण माझ्या पत्नीने किंवा मी कधीही माझा धर्म बदलला नाही. ते म्हणाले, मी मुस्लिम नाही.

मला उर्दू नाही कळत, त्यामुळे मला नाही माहित की त्या दस्ताऐवजमध्ये काय लिहिले आहे. पण माझी पत्नी मला प्रेमाने दाऊद म्हणायची. ते म्हणाले, माझा मुलगा अभिमन्यूसारख्या शत्रूंनी घेरला आहे, पण तो चक्रव्यूह तोडून बाहेर येईल, असा आम्हाला विश्वास आहे.

क्रुझ ड्रग्ज पार्टीबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही वानखेडे यांना घेरले. ते म्हणाले, क्रूझवर वानखेडेचा एक दाढीवाला मित्रही होता जो त्याच्या मंगेतरसोबत नाचत होता. हा दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आहे. तिहार आणि राजस्थानच्या तुरुंगातही तो होता. मात्र समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली नाही. हा दाढीवाला कोण आहे हे एनसीबीला सांगावे लागेल, असा सवाल मलिक यांनी केला.

तो कोणत्या देशाचा नागरिक आहे आणि त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. क्रूझ पार्टीचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आहे. तपासासाठी येथे आलेल्या एनसीबीच्या पथकानेही या फुटेजची छाननी करावी. वानखेडे यांनी व्हिडीओ न दिल्यास ते स्वत: व्हिडिओ देणार आहेत. एनसीबीने क्रूझवर छापा टाकला नसल्याचा दावाही मलिक यांनी केला. फक्त सापळा रचून काही लोक अडकले. क्रूझचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल, असे मलिक म्हणाले आहे.

क्रूझ पार्टीची परवानगी महाराष्ट्र सरकारची नसून थेट शिपिंग महासंचालनालयाकडून घेण्यात आली होती, असा दावाही मलिक यांनी केला. ते केंद्राच्या अखत्यारीत येते. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक रोज नवनवे खुलासे करत आहेत. कुटुंबीयांना या प्रकरणात ओढण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. आता समीर वानखेडेची बहीण यास्मिन वानखेडे हिने नवाब मलिकवर जोरदार प्रहार केला आहे.

यास्मिनने नवाब मलिक यांच्या या वक्तृत्वाबद्दल पोलिसांत तक्रार देऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

नवाब मलिक यांना ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विरोधात कोणतीही टिप्पणी न करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मुंबईचे रहिवासी कौसर अली यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. व्यसनींच्या पुनर्वसनासाठी तो काम करतो असा अलीने दावा केला आहे.

आर्यन खान प्रकरणाशी संबंधित एनसीबी किंवा इतर कोणत्याही तपास संस्थेच्या अधिकार्‍यांविरुद्ध कोणतीही टिप्पणी करू नये, असे आदेश त्यांनी उच्च न्यायालयाला दिले. याचिकाकर्त्यांचे वकील अशोक सरोगी यांनी सरन्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांच्या खंडपीठाकडे तातडीने सुनावणीची मागणी केली. परंतु उच्च न्यायालयाने सरोगी यांना सुट्टीतील खंडपीठाकडे जाण्यास सांगितले.

महत्वाच्या बातम्या-
आर्यनला जामीन मिळवून देणारे वकील मुकूल रोहतगी आहेत तरी कोण? फी ऐकूनच धक्का बसेल
‘मन्नत’च्या बाहेर जल्लोष; आर्यन खानला जामीन मिळताच फटाके फोडत घोषणाबाजी सुरुच…
आर्यन खानच्या जामीनात ‘या’ मंत्रालयाने बजावली महत्वाची भूमिका; वकील रोहतगींनीच केला खुलासा

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: