आरोपी सुटले आता साक्षीदारच अडकणार? गोसावीच्या अटकेनंतर मुंबई पोलीसांच भानुशालीला सन्मस

October 29, 2021 , 0 Comments

मुंबई | 3 ऑक्टोबरला कॅडेलिया क्रूझवर झालेल्या कथीत रेव्ह पार्टीवर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं केलेल्या कारवाईवेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली. तेव्हा तिथे भाजप कार्यकर्ता मनीष भानुशाली हजर होते त्यांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. याच प्रकरणातील आणखी पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

3 ऑक्टोबर रोजी मुंबईजवळ समुद्रात गोव्याकडे निघालेल्या कॅडेलिया क्रूझवर रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीची माहिती भाजप कार्यकर्त्या असलेल्या मनिष भानुशाली याला मिळाली होती. त्यामुळं त्याने त्याची माहिती एनसीबीला कळवली होती.

या माहितीवरुन एनसीबीने क्रूझ पार्टीवर छापा टाकला. या हायप्रोफाईल पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खाननेही हजेरी लावली होती. त्यामुळे त्याला तसेच त्याचा मित्र अरबाज मर्चंटला अटक करण्यात आली होती. त्यासह 8 जणांना अटक करण्यात आली होती.

भानुशालीकडे याची पक्की खबर असल्यानं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यालाच सोबत घेऊन क्रूझवर छापा टाकण्यात आला होता, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. म्हणजेच मनिष भानुशाली हा या प्रकरणातील एक प्रत्यक्ष साक्षीदार होता. काही दिवसांपूर्वी भानुशालीने आपल्या जिवाला धोका असल्याने सरकारकडे त्यांच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची मागणी केली होती.

त्यातच आता मुंबई पोलिसांनी समन्स बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मनिष भानुशाली याच्यासोबत पंच म्हणून असलेले किरण गोसावी आणि प्रभाकर साईल यांचे जबाबही समोर आले आहेत. यामध्ये किरण गोसावी हा पुणे पोलिसांना पाहिजे असलेला फरार आरोपी असून त्याला काल पुणे पोलिसांनी कात्रज येथून ताब्यात घेतले आहे.

किरण गोसावीवर पुण्यात एक गुन्हा दाखल आहे. तर प्रभाकर साईल याने तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा गंभीर आरोप करणारं प्रतिज्ञापत्रच सोशल मीडियातून व्हायरलं केल्यानं खळबळ माजली होती. त्यामुळे या दोघांनाही आता कोर्टासमोर उभ करण्याची शक्यता आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: