“चहा विकणारे रेल्वे, विमान कंपन्या विकताय, फक्त आता पंतप्रधानपदाची खुर्ची विकायची राहीलीये”
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्यावतीने रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेच्या सभागृहात वीज कामगार मेळावा आणि कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साममाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहील. समाजवाद ही काळाची गरज आहे, असे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे.
शेतकरी विरोधी कायदे आणि प्रस्तावित वीज बिल कायदा रद्द करण्यासाठी संघर्ष सुरु आहे. शेतकरी, कामगार, विरोधी धोरणाविरोधात लढाई लढत आहे. चहा विकणारे विमा, रेल्वे, विमान कंपन्या विकत आहे. फक्त पंतप्रधानपदाची खुर्ची विकायची शिल्लक आहे.
ही २०२४ च्या निवडणूकीची तयारी सुरु आहे. या लढ्यात शेतकरी जिंकला तरच देशातील शेतकऱ्यांसह कामगार वाचेल. यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे प्रयत्न करावा, असे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे.
आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामध्ये मेधा पाटकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी कार्यक्रमाच्यावेळी पाटकर यांच्या हस्ते वीज कामगार नेते वर्क्स फेडरेशन अध्यक्ष मोहन शर्मा यांना माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा जीवनगौरव पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचे विना मेकअपचे फोटो झाले व्हायरल, फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
अमेरिकेत खळबळ! एलियन्सने अमेरिकेच्या न्युक्लीअर मिसाईल्स केल्या डिऍक्टीवेट, माजी ऑफिसरचा दावा
आता बाॅलीवूडमध्ये तुमच्यासाठी कोणतीही स्क्रिप्ट नाही, रिटायर्ड व्हा; सलीम खानांचा अमिताभला सल्ला
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: