दसरा मेळाव्याला रामदास कदमांना नो एंट्री?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले

October 13, 2021 , 0 Comments

शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा हा खुप विशेष असतो. पण सलग दुसऱ्यावर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाहीये. पण यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के लोकांच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा होणार आहे.

मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, महापौर आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते या दसऱ्या मेळाव्या उपस्थित राहणार आहे. यावेळी सामान्य शिवसैनिकांना दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहता येणार नाही. तसेच या मेळाव्याला वरिष्ठ नेते रामदास कदम हे उपस्थित राहणार का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माजी मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवा शिवसेना वाद पुन्हा रंगला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच रामदार कदमांवर पक्षांर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्या कथित ऑडिओक्लिपची शहानिशा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत होती. मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांना बोलावलं नसेल याचीही चर्चा आहे.

रामदास कदम हे शिवसेनेचे जेष्ठ नेते असून माजी मंत्री देखील राहिलेले आहे. त्यांची अशी ऑडिओ क्लिप बाहेर येणे योग्य नसल्याचे काही शिवसेना नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई केली तर पक्षात यापुढे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे रामदास कदमांवर कारवाई कऱण्याची दाट शक्यता असल्याची सांगण्यात येत आहे. रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे पक्ष बदनाम होत असून यंदाच्या दसऱा मेळाव्यात त्यांना एंट्री नसेल असेही काही नेत्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“चहा विकणारे रेल्वे, विमान कंपन्या विकताय, फक्त आता पंतप्रधानपदाची खुर्ची विकायची राहीलीये”
बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचे विना मेकअपचे फोटो झाले व्हायरल, फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा खुलासा, इंडस्ट्रीमध्ये नेपोटीझमपेक्षा ‘या’ गोष्टीशी वर्षानुवर्षे मी लढत आहे


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: