प्रेमविवाहनंतर २० दिवसांतच तरुणीने संपवलं स्वत:चं आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

October 24, 2021 , 0 Comments

गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. आता अशीच एक घटना मध्य प्रदेशमधून समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या एका तरुणीने लग्नाच्या २० दिवसानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. संबंधित महिलेचे नाव नेहा चौहान असे आहे.

आता प्रेमविवाहानंतर अवघ्या २० दिवसांनी फाशी घेतलेल्या नेहा चौहानच्या प्रकरणात पोलिसांनी तिच्याच पतीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. नेहाच्या लग्नानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून नेहाने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. असे म्हणत तिच्या कुटुंबियांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लग्न झाल्यापासून पती तिला दररोज बेदम मारहाण करत होता, अशी माहिती समोर आली आहे. ही घटना १२ सप्टेंबर रोजी हरगोविंदापुरम येथे घडली. पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत. तिच्या पतीचे नाव राहूल बाथम असे आहे. या घटनेने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुरार येथील सिद्धेश्वर नगरमध्ये राहणारी २२ वर्षीय नेहा चौहान सिटी सेंटर पटेल नगरमधील शोरूमजवळील एका खासगी कार्यालयात काम करत होती. कामावर जात असताना ३ महिन्यांपूर्वी तिची पटेल नगर हरगोविंदापुरम येथील रहिवासी राहुलशी मैत्री झाली. हळूहळू दोघांची भेट होऊ लागली. २२ ऑगस्ट रोजी दोघांनीही आपापल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन मंदिरात लग्न केले. लग्नासाठी कुटुंबांच्या विरोधात गेलेले प्रेमी लग्नानंतर एकमेकांशीच भांडायला लागले.

११ सप्टेंबरच्या रात्री नेहा आणि राहुलमध्ये वाद झाला. यानंतर दोघेही वेगळे झोपले. रात्री ३.३० च्या सुमारास राहुलने बघितलं की नेहा झोपलेली आहे. त्यानंतर त्याला झोप लागली. १२ सप्टेंबरला सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने त्याच खोलीत नेहाने गळफास घेतल्याचे पाहिले. त्यानंतर राहूल फरार झाला. ही घटना मुलीच्या कुटुंबाल कळताच त्यांनी राहूल विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, राहूल तिच्यासाठी लग्नाआधी काहीही करायला तयार होता. त्यामुळे घरच्यांशी भांडून नेहाने त्याच्याशी लग्न केलं, पण लग्नानंतर अचानक सर्व स्वप्नांचा चुराडा झाला. राहुलकडे ना काम होते ना पैसा. त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो तिला मारहाण करायचा.

१९ दिवसात त्याने नेहाला अनेक वेळा मारहाण केली. ती घरी जाऊ शकली नाही कारण राहुलमुळे घरच्यांशीही तिचे नाते बिघडले होते. त्यामुळे तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. आता पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध तिला हे पाऊल उचलण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
हुंडा दिला नाही म्हणून महिलेचा छळ, सर्वांसमोर नग्न करुन बळी देण्याचा प्रयत्न; बारामती हादरली
घागऱ्यांमध्ये लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते करोडोंचे ड्रग्स, एनसीबीने केला भांडाफोड
राम रहीम प्रकरण एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही; प्रकरण दाबण्यासाठी केले होते ‘हे’ भयंकर प्लॅन


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: