नवाब मलिकांच्या गंभीर आरोपांवर समीर वानखेडेंच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला भिती वाटते…

October 24, 2021 , 0 Comments

क्रूज ड्रग्स प्रकरणात, राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक सतत एनसीबीला लक्ष्य करत त्यांच्यावर टीका करत आहेत. गुरुवारी नवाब मलिक यांनी पुण्याच्या मावळ परिसरात एका सभेला संबोधित करताना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना खुले आव्हान दिले.

ते म्हणाले की, एका वर्षात समीर वानखेडेला तुरुंगात पाठवेल. याला खुले आव्हान समजा असेही ते म्हणाले होते. तसेच नवाब मलिक म्हणाले होते की, मी समीर वानखेडेंना खुले आव्हान देतो, तुम्ही एका वर्षात तुमची नोकरी गमवाल, तुम्ही तुरुंगात जाणार हे निश्चित आहे. तुमच्याद्वारे केलेली फसवणूक आम्ही लोकांसमोर आणणार.

यावेळी नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांचा बाप बोगस, ते स्वत: बोगस, त्यांचे कुटुंब बोगस अशी टीका केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते सतत समीर वानखेडे यांच्यावर टीका करताना दिसत आहे. पण यावेळी त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या वडिलांवर टीका केली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील कोण होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. ते देखील एक पोलिस अधिकारी होते, जे आता सेवानिवृत्त झाले आहे. वाशीम जिल्ह्यातून एका छोटाश्या गावातून ते १९७५ साली मुंबईला आले होते. सुरुवातीला ते पोलिस उपनिरीक्षक होते. त्यानंतर अधिकारी बनले.

ज्ञानदेव सांगतात, की त्यांनी स्वत: ४-५ ड्रग्स केस हाताळल्या आहे. यावेळी ज्ञानदेव यांनी नवाब मलिकांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणालाही घाबरणारा किंवा कोणाच्याही कोणत्याही धमक्यांना भीक घालणारा नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले आहे.

वानखेडे यांच्या घरात मुलगा समीर आणि मुलगा यास्मीन यांच्यात कधीही भेदभाव करण्यात आला नाही. त्या दोघांनीही मला वर्दीत बघितले होते. दोघांनीही माझ्याकडून प्रेरणा घेत माझ्या पाऊलावर पाऊल ठेवले. यास्मीन या व्यवसायान क्रिमिनल लॉयर आहे तर समीर एनसीबी कार्यालयात प्रादेशिक संचालक आहे, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले आहे.

एक पालक म्हणून समीर समाजासाठी जे काही करतोय, नशामुक्तीसाठी करत असलेल्या त्याच्या कामाचे लोकांनी कौतूक करायला हवे, पण त्याच्या धाडसी कारवायांमुळे मला थोडी भितीही वाटते, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
प्रेमविवाहनंतर २० दिवसांतच तरुणीने संपवलं स्वत:चं आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर
हुंडा दिला नाही म्हणून महिलेचा छळ, सर्वांसमोर नग्न करुन बळी देण्याचा प्रयत्न; बारामती हादरली
राम रहीम प्रकरण एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही; प्रकरण दाबण्यासाठी केले होते ‘हे’ भयंकर प्लॅन


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: