लसीचे दोन डोस घेऊनही राज ठाकरेंना कोरोनाची लागण, आई आणि बहिणीचा रिपोर्टही आला पॉझिटीव्ह

October 24, 2021 , 0 Comments

सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे, त्यामुळे राज्यातील सर्व भागातून निर्बंध हटवण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना काळाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत होते.

असे असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली असून त्यांच्या आई आणि बहिणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी त्यांनी स्वत:ला घरी क्वारंटाइन केले होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने राज ठाकरे आणि त्यांच्या बहिणीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या आईवर घरी उपचार सुरू आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल देण्यात येणार आहे. त्यांना अँटीबॉडी दिल्यानंतर तीन तासांत घरी सोडले जाईल. राज ठाकरे, हे नुकतेच नाशिक, पुणे आणि ठाणे दौऱ्यावर आले होते आणि पुढील वर्षीच्या निवडणुकांसाठी मुंबईत पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली होती.

राज ठाकरे यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने राज ठाकरे यांनी आपले पुढचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. राज ठाकरे शनिवारी मुंबईच्या भांडूप आणि रविवारी पुण्याला एक बैठक घेणार होते. यावेळी ते कार्यकर्त्यांचीही भेट घेणार होते. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व बैठका पुढे ढकलण्यात आल्या आहे.

कोरोनाच्या काळातही राज ठाकरे यांनी कधीही मास्क घातलेले दिसून आले नाहीत. ते मास्क न घालता त्यांच्या घरी, कृष्णा कुंज येथे लोकांना भटायचे. सप्टेंबर २०२० मध्ये, त्यांना मास्क न घातल्याबद्दल १००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. त्यावेळी ते रायगड जिल्ह्यातील मांडवा येथे एका मास्कशिवाय बोटीवर बसले होते. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल त्यांना दंड भरावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या-
अरबाजशी घटस्फोट घेण्याच्या आदल्या रात्री काय काय घडलं होतं? मलायकाने केला मोठा खुलासा
राम रहीम प्रकरण एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही; प्रकरण दाबण्यासाठी केले होते ‘हे’ भयंकर प्लॅन
‘या’ एका कारणावरून कादर खान आणि अमिताभ बच्चन यांचे नाते बिघडले होते; वाचा संपूर्ण किस्सा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: