रक्षकच बनला भक्षक! पुण्यातील पोलिस अधिकाऱ्याने केला तरुणीवर बलात्कार; आरोपीच्या बहिणीवरच केले अत्याचार

October 03, 2021 , 0 Comments

राज्यात महिला अत्याचारांच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशातच पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यात एका PSI पदावरील पोलिस अधिकाऱ्याने एका २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आरोपीने आपले पहिले लग्न लपवून तरुणीची फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याची कळताच पीडित तरुणीने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यावर बलात्कारासह अन्य कलमांतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

प्रवीण नागेश जर्दे असे आरोपीचे नाव आहे.संबंधित आरोपी हा पोलिस अधिकारी असून तो कोथरुडचा रहिवासी आहे. प्रवीण जर्दे हा सध्या येरवडा पोलिस वाहतूक विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

आरोपी प्रवीण जर्देने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यानंतर तिला पुणे शहर आणि आसपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर तरुणी लग्नाबद्दल बोलली तर तिला त्या आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपी प्रवीण जर्दे या PSI अधिकाऱ्याची नियुक्त २०१८ साली पुण्यातील कोथरुड पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मे २०२० मध्ये एका प्रवीण जर्दे एका गुन्ह्याचा तपास करत होता. त्या गुन्ह्याच्या आरोपीच्या बहिणीसोबत त्याची ओळख झाली होती.

प्रवीण जर्देने त्या तरुणीपासून पहिले लग्न झाल्याचं लपवून ठेवले होते. तसेच तिच्याशी आणखी ओळख वाढवली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तरुणीने जेव्हा लग्नाची मागणी केली, तेव्हा तो टाळाटाळ करु लागला. तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली, असे तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! समुद्रातील ड्रग्स पार्टीवर NCB ची धाड; बॉलीवूड अभिनेत्यांच्या मुलांसह १० जण ताब्यात
दुख:द! वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांच्या प्रतिमेला हार घालताना माजी आमदाराचे हार्ट अटॅकने निधन
येडा की खुळा! युवकाने थेट कुकरशी केले लग्न, नंतर हे कारण सांगत घेतला त्याच्याशी घटस्फोट


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: