नथुराम गोडसेवर चित्रपट येणार; महात्मा गांधींच्या १५२व्या जयंतीदिवशीचं महेश मांजरेकरांची मोठी घोषणा

October 03, 2021 , 0 Comments

मुंबई। शनिवारी देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात आली. याच निमित्ताने मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी गांधी जयंती निमित्ताने गोडसे’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

व त्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीच्या निम्मिताने त्यांनी ही घोषणा केली आहे. महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो आणि टीझर शेअर करताना त्यांनी एक पोस्ट केली आहे.

महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची घोषणा करत सर्वप्रथम राष्ट्रपती महात्मा गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये मांजरेकर यांनी म्हटले आहे की, ‘नथुराम गोडसेची कथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे.

या स्वरुपाच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागते. माझा नेहमीच कठीण विषयांवर आणि बिनधास्त गोष्टींवर विश्वास आहे. सिनेमाचे हे कथानक अशाच पद्धतीचे आहे. महात्मा गांधींवर गोळीबार करणारी व्यक्ती ही ओळख वगळता त्यांच्याबद्दल कुणालाच जास्त माहिती नाही.

त्यांची कथा सिनेमातून सांगताना, कुणालाही पाठिशी घातलेले नाही ना कुणाच्या विरोधात भाष्य केले आहे. योग्य काय अयोग्य काय आहे ते प्रेक्षकांवर आम्ही सोडले आहे,’ अस म्हणाले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा!’ त्याचप्रमाणे यांच्या सोबतच संदीप सिंग, राज शांडिल्य यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त “गोडसे” सिनेमाची घोषणा केली आहे.

त्यामुळे आता हा सिनेमा चाहत्यांच्या मनावर राज्य करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या महेश मांजरेकर हे चांगलेच चर्चेत आहे. कारण मांजरेकर हे सध्या बिग बॉस या शोचे होस्ट आहेत. त्यात आता नवीन चित्रपटाची घोषणा केल्याने ती अधिक चर्चेत आले आहेत.

या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग यांच्या प्रॉडक्शन हाऊस लीजेंड ग्लोबल स्टुडिओ आणि ड्रीम गर्लचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांचे प्रोडक्शन हाऊस, थिंकइंक पिक्चरझ यांच्यासोबत होणार आहे, तर दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर या प्रकल्पाचे दिग्दर्शन करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार द. मा. मिरासदार काळाच्या पडद्याआड; वयाच्या 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास

“किरीट सोमय्या ही मुर्ख व्यक्ती आहे, केंद्रातली सत्ता गेली तर परदेशात पळून जाण्याची वेळ येईल”

सोसायटीच्या चेअरमनने लावला महिलेच्या बेडरुमजवळ सीसीटीव्ही कॅमेरा, टिपले खाजगी क्षण; पुण्यातील धक्कादायक घटना

तरुणाने भंगारातून बनवला आयरन मॅनचा सुट; आनंद महिंद्रांनीही केले कौतुक, मग केले असे काही.., पहा व्हिडीओ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: