मनीष गुप्ता यांचे रक्ताने माखलेले फोटो आले समोर; पत्नी, म्हणाली आता तुम्हीच न्याय द्या

October 02, 2021 , 0 Comments

कानपूरचे प्रॉपर्टी डीलर मनीष गुप्ता यांच्या हत्येचे प्रकरण आता राजकीय होताना दिसत आहे. एकीकडे, गुरुवारी सपा नेते अखिलेश यादव यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. तसेच २० लाखांची मदत करताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी एडीजी कायदा आणि सुव्यवस्थेअंतर्गत २ समित्या स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. पण या सगळ्यामध्ये मनीषची पत्नी मीनाक्षीची अवस्था बिकट आहे.

मीनाक्षी न्यायाच्या आशेने निष्पाप मुलाला तिच्या मांडीवर घेऊन इकडे तिकडे भटकत आहे. दरम्यान, पीडितेने तिच्या पतीच्या रक्ताने भिजलेल्या मृतदेहाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीने पोलिसांवर आरोप केला आहे की पोलिसांच्या मारहाणीत तिच्या पतीने आपला जीव गमावला आहे.

तसेच मनीष गुप्ताची हत्या होऊन आज तीन दिवस झाले असूनही आजपर्यंत मारेकऱ्यांवर कठोर कारवाई झालेली नाही. मनीषचा मृतदेह बुधवारी सकाळी गोरखपूरहून कानपूरला आणण्यात आला. पण अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंब सहमत नव्हते.

जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि मुख्यमंत्री योगींना भेटणार नाहीत तोपर्यंत अंतिम संस्कार करणार नाही अशी त्यांची मागणी होती. मात्र, नंतर पोलिसांनी मीनाक्षीला समजवले आणि मृतदेहावर अंतिम संस्कार केले.

रडणाऱ्या पत्नी मीनाक्षीने तिच्या पतीचे रक्ताने माखलेल्या अवस्थेत एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने आपली व्यथाही मांडली आहे. मीनाक्षीने लिहिले, मित्रांनो, आता मी एकटी झाली आहे, मनीष आम्हाला सोडून गेले आहे. आता तुम्ही सर्वांनी मला साथ द्या, आता तुम्हाला निर्दोष मनीष जींना न्याय मिळवून द्यावा लागेल.

दरम्यान, मनीष गुप्ता (३६), बारा टीन, कानपूर येथील रहिवासी एका रिअल इस्टेट कंपनीत काम करायचे. मनीष हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. वृद्ध वडील पत्नी मीनाक्षी आणि मुलगा अभिराज (४) सह कुटुंबात राहत होते. मनीषचे ८ वर्षांपूर्वी मीनाक्षीशी लग्न झाले होते. मुलाच्या हत्येचे वृत्त समजताच वृद्ध वडिलांची प्रकृती खालावली आहे.

मनीष त्याचे चांगले मित्र प्रदीप चौहान, हरदीप सिंग यांच्यासोबत गोरखपूरला भेटायला गेले. मनीष आपल्या मित्रांसोबत हॉटेल कृष्णा पॅलेसच्या रूम क्रमांक ५१२ मध्ये राहत होता. सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास रामगढ ता पोलीस हॉटेलमध्ये तपासणीसाठी पोहोचले होते, असा आरोप आहे.

पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला आणि प्रत्येकाला आयडी विचारण्यास सुरुवात केली. आयडी तपासल्यानंतर पोलिसांनी प्रत्येकाच्या बॅग तपासण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या कारवाईवर मनीष म्हणाला की आम्ही दहशतवादी नाही, तीच गोष्ट पोलिसांना असह्य झाली. पोलिसांनी मनीष आणि त्याच्या मित्रांना निर्दयपणे मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मनीषला मारहाण केली.

दरम्यान, मनीषची प्रकृती खालावली. पोलिसांनी मनीषला एका खासगी रुग्णालयात नेले, मनीषला गंभीर अवस्थेत बीआरडी रुग्णालयात रेफर करण्यात आले. पोलिसांनी मनीषला रुग्णवाहिकेत बीआरडीकडे पाठवले जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मनीषच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की त्याच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आहेत, मनीषला शस्त्रांच्या खुणा आणि बुटांनी मारहाण करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

उर्फी जावेदने केली बोल्डनेसची हद्दपार; हॉट फोटो शेअर करत म्हणाली, कॅप्शन प्लिज
सोनम कपूरच्या पतीने तिचा कपडे घालतानाच व्हिडीओ काढला; व्हिडीओ पाहून तोंडात बोटे घालाल
अभिनेत्रीने केले होते फरहानवर अनैसर्गिक संभोगाचे धक्कादायक आरोप, कोर्टाने दिले आता ‘हे’ आदेश


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: