अंपायर झोपला होता का? नो बॉल असतानाही अंपायरने के एल राहुलला आऊट दिले

October 25, 2021 , 0 Comments

मुंबई। रविवारी संपूर्ण देशाच लक्ष लागलेल्या टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताच्या पदरी निराशा पडली. पाकिस्तानने विजयारंभ करत भारताला मात दिली. महत्वाचे म्हणजे वनडे आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान पहिल्यांदा भारताला हरवण्यात यशस्वी ठरला.

पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजी दिली. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्ताने प्रत्युत्तरात १० गडी राखून हे आव्हान सहज पूर्ण केले. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानसाठी उत्कृष्ट खेळी खेळली.

मात्र भारताला मात्र पराभव स्वीकारावा लागला. एकीकडे भारताचा पराभव झाल्यानं अनेक ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे के. राहुल पंचाच्या चुकीमुळे बाद झाल्याचं समोर आलं आहे. नो बॉलवर केएल राहुलला आऊट दिलं असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

दिग्गज फलंदाजांना भरणा असताना विराट-पंत वगळता एकाही फलंदाजा साजेशी खेळी करता आली नाही. युवा शाहीन आफ्रिदीच्या माऱ्यापुढे आधी रोहित शर्मा अन् नंतर के. एल राहुल बाद झाले. शाहीनने भारताच्या सलामीवीरांना बाद करत भारताचे कंबरडे मोडलं. व त्यानंतर भारताचा पाय ढासळला.

के. राहुल पंचाच्या चुकीमुळे बाद झाल्याचं समोर आलं आहे. राहुल नो-बॉलवर बाद झाल्याचं फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच राहुलवर अन्याय झाला असल्याचे तसेच अंपायर झोपला होता का? असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित करत आहेत.

शाहीन आफ्रिदीच्या अप्रितम चेंडूवर राहुल त्रिफाळाचीत बाद झाला. पण शाहीनचा हा चेंडू नो-बॉल असल्याचं स्पष्ट दिसत होतं. सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी शाहिन आफ्रिदीच्या बॉलिंगचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पाहू शकता की त्याचा पाय क्रीझच्या थोड पुढे असल्याचं दिसत आहे.

टीम इंडियाला के एल राहुलकडून खूप आशा होत्या. सर्वांच्या नजरा यांच्या खेळीकडे लागल्या होत्या. के एल राहुलने आऊट झाल्यानंतर थर्ड अंपायरचा निर्णय न घेता मैदान सोडलं. दुसरीकडे अंपयारनेही थर्ड अंपायरचा निर्णय दिला नाही. थेट के एल राहुलला आऊट दिलं. अंपायरची ही चूक राहुलवर अन्याय करणारी ठरली. व त्यामुळे आता संताप व्यक्त केला जात आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: