25 कोटींचा बॉम्ब टाकून समीर वानखेडेंवर आरोप करणारा प्रभाकर साईल नक्की आहे कोण? जाणून घ्या सविस्तर

October 25, 2021 , 0 Comments

मुंबई। आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला दिवसेंदिवस धक्कादायक वळण येत आहे. दरम्यान रविवारी आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे.

आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे. व या बॉम्बमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यांवर करण्यात आलेल्या आरोपांची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

मात्र प्रभाकर साईल या व्यक्तीनं जे आरोप करून खळबळ उडवली तसेच एनसीबीच्या अडचणीत वाढ केली ते नेमकी आहेत तरी कोण? या तर जाणून घेऊयात प्रभाकर साईलबद्दल.

कोण आहेत प्रभाकर साईल?
प्रभाकर राघोजी साईल (वय 40) हे अंधेरी पूर्वेला येथे राहतात. ते केपी अर्थात किरण प्रकाश गोसावी यांचे बॉडीगार्ड आहेत. 22 जुलै 2021 पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून तो काम करत आहे. 30 जुलै 2021 रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेला होता.

त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचं गोसावीने त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर गोसावीने साईलला बॉडीगॉर्ड म्हणून नेमलं होतं. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

किरण गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं आणि ऐकल्याचं प्रभाकर साईल यांचा दावा आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: