‘कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, मी स्वत: दिव्या भारतीसोबत ड्रग्ज घेतलेत’
मुंबई । गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टीमध्ये अटक करण्यात आली. ती सध्या कोठडीत आहे. आता त्याची कसून चौकशी सुरू आहे. असे असताना अनेक गोष्टी सध्या बाहेर येत आहेत.
आता अनेकांनी आर्यनला पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा जाहीर करत अनेक कलाकारांनी काही खळबळजनक खुलासे देखील केले आहेत. यामध्ये सोमी अली हिने आपणही ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे. सोमी अलीने आर्यन खानला पाठिंबा देण्यासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ती म्हणाली, ‘जेव्हा मी १५ वर्षांची होती तेव्हा ड्रग्ज घेतले होते. ‘आंदोलन’ सिनेमाच्या शूटिंगवेळी मी आणि दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीने देखील ड्रग्ज घेतले होते.
ती म्हणते की, आजच्या काळात असा कुणी मुलगा आहे का ज्याने ड्रग्ज ट्राय केलेले नाही? त्यामुळे या सर्व मुलांना सोडून द्यायला हवे. ड्रग्जची सवय ही वेश्यागमन करण्यासारखेच आहे. ही सवय कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी सुटतेच असे नाही. त्यात मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
मी देखील १५ वर्षांची असताना गांजाचे व्यसन केले होते. त्यानंतर आंदोलन सिनेमाच्या सेटवर दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबतही मी ड्रग्ज घेतले होते. याबद्दल मला पश्चाताप नाही, तसेच न्यायव्यवस्था आपण कसे योग्य आहोत, हे पटवून देण्यासाठी आर्यनचा वापर केला जात आहे. यामध्ये या मुलांना त्रास होत आहे, असेही तिने म्हटले आहे.
सोमी अलीच्या या पोस्टवर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. सोमी अलीही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड होती. यामुळे ती चर्चेत असते, आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: