महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकत्र यावे, शरद पवारांची हाक..
सोलापूर । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देशातील आणि राज्यातील सर्वच विषयांना हात घातला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, असेही म्हटले आहे.
तसेच राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा स्वतंत्र लढूया, असे म्हटले आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवर आली आहे. याबाबत काही निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाटेवर असलेले महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणुका लढविणे जाणार असल्याची शक्यता आहे, मात्र याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध नसला तरी नाराजी आहे, यावर आज पवार निर्णय घेणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील निवडणुकीत अनेक पदे घेतलेले लोक पक्ष सोडून गेले. तरुणांना विश्वास देणे गरजेचे होते, म्हणून मी मागील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मी इथे सभा घेतली, आणि याचा फायदा आपल्याला झाल्याचे पवारांनी सांगितले आहे.
तसेच अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कारवाईबाबत देखील त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ज्या बँकेचा मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवले. असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जनता यांना धडा शिकवेल. महाराष्ट्र बंदबाबत देखील त्यांनी यावेळी सूचना केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: