मलिक-वानखेडे वाद: उज्ज्वल निकम यांनी दिला 'हा' धोक्याचा इशारा
सांगली: राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांबाबत सध्या अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही बाब देशाच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी अतिशय वाईट आहे. तपास यंत्रणांनी देखील एखाद्या घटनेचा तपास करताना संयम बाळगला पाहिजे. उगाच चमकोगिरी करून वाटेल तशी पत्रकं काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवणं टाळायला हवं. तुमच्या या कृत्यांमुळे राजकीय व्यक्ती तुमच्यावर टीका करायला उद्युक्त ठरणार नाहीत, याची अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील यांनी व्यक्त केले. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. ( ) वाचा: मुंबईतील प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आले असून मंत्री यांनी ही संपूर्ण कारवाईच बोगस असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. मलिक सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. हे आरोप फेटाळत वानखेडे यांनीही कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या सगळ्याला मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात झालेल्या कारवाईचीही पार्श्वभूमी आहे. या संपूर्ण घटनाक्रमाबाबत विचारले असता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आणि त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या राज्यकर्त्यांनाही फटकारले. वाचा: निकम म्हणाले, 'राजकीय नेत्यांनी जर तपास यंत्रणा आणि त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तोही तपास चालू असताना, तर मला वाटते की हा कायदा व सुव्यवस्थेला मोठा धोका आहे. जर राजकीय व्यवस्थेला तपासाबाबत शंका असतील, तर त्यांनी त्याबाबत न्यायालयात दाद मागावी. केवळ प्रसिद्धी माध्यमातून तपास यंत्रणेबद्दल शंका उपस्थित करणे योग्य नाही. तपास अधिकाऱ्यांनीही चमकोगिरी करण्यासाठी प्रसार माध्यमांचा आधार घेऊ नये. अन्यथा असे प्रकार कायदा सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरतील.' वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: