मी जन्मदात्रीच वैरीण नाही, मन घट्ट करुन मुलीला संपवतेय; सुसाईड नोटमध्ये आईची मन हेलावणारी व्यथा

October 03, 2021 , 0 Comments

कोरोनामुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे, त्यामुळे अनेक कुटुंबही उधवस्त झाले आहे. अशात अनेक धक्कादायक घटनाही बघायला मिळत आहे. आता नाशिकमधून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एका महिलेने आधी आपल्या मुलीला संपवले आहे, त्यानंतर स्वत:नेही आत्महत्या केली आहे.

सुजाता प्रवीण तेजाळे असे या महिलेचे नाव आहे. सुजाता यांचे पती प्रवीण तेजाळे यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता. मुलगी सतत वडिलांची आठवण काढत होती. तसेच सुजाता यांनाही पतीचा विरह सहन होत नव्हता, त्यामुळे सुजाता यांनी मुलीसह आत्महत्या केली आहे.

मी जन्मदात्री आईच, पण हे जग खुप वाईट… जन्म देताना जसा त्रास झाला तसे मन घट्ट करुन मी हा निर्णय घेत आहे. मी जन्म दात्रीच आहे वैरीण नाही, यासोबत अनेक गोष्टी सुजाता यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मांडल्या आहे.

सुजाता प्रवीण तेजाळे (वय-३६) व अनया प्रवीण तेजाळे (वय-७) असे या मायलेकीचे नाव आहे. त्या नाशिकच्या विनयनगर येथे राहत होत्या. शुक्रवारी या दोघांनी आत्महत्या केली आहे. सुजाता यांचे दिर अशोक तेजाळे हे सुजाता यांच्या घरी आले असता हा सर्वप्रकार समोर आला आहे.

या जगात खुप वाईट लोक आहे. त्यामुळे बराच विचार करुन तिला घेऊन चालले आहे. मुलगीही पप्पांची सतत आठवण काढत होती. पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ असे चिमुकलीने सांगितल्यानंतर आईने हा निर्णय घेतल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे देवा! ऑपरेशन दरम्यान महिलेला आलं रडू; हॉस्पिटलने बिलासोबत रडण्याचेही घेतले पैसे; फोटो व्हायरल
नथुराम गोडसेवर चित्रपट येणार; महात्मा गांधींच्या १५२व्या जयंतीदिवशीचं महेश मांजरेकरांची मोठी घोषणा
VIDEO: नागाला जंगलात सोडण्यासाठी जात होता सर्पमित्र, लोकांच्या हट्टापायी बाहेर काढला नाग अन्…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: