अरे देवा! ऑपरेशन दरम्यान महिलेला आलं रडू; हॉस्पिटलने बिलासोबत रडण्याचेही घेतले पैसे; फोटो व्हायरल

October 03, 2021 , 0 Comments

मुंबई। आजकाल माणसाला कोणता आजार कधी होईल हे सांगता येत नाही. व त्यामुळे बरेजण आपल्या जीवाला जपत असतात. त्यात बरीचशी मंडळी अशी असते जी कितीही आजारी पडली तरी हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे खर्च होत असल्याने हॉस्पिटलमध्ये जाणं टाळतात. व घरीच औषधोपचार करतात.

मात्र यांपैकीच बरीचशी मंडळी अशी असतात जी अगदी छोट्या छोट्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये जात असतात. सध्या बऱ्याच महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक उपाय करत असतात. काहीजणी तर चक्क चेहऱ्याची सर्जरी करतात. तर काहीजणी या आपल्या चेहऱ्यावरील डाग तसेच निशाण घालवण्यासाठी सर्जरी करतात.

मात्र ही सर्जरी किंवा एखाद छोटास ऑपरेशन असलं तरी घाबरत असल्याने अनेकांना रडू कोसळत. व त्यामुळे ऑपरेशन दरम्यान त्या व्यक्ती सोबत असलेले नर्स किंवा डॉक्टर्स हे त्या महिलेला धीर देत असतात. मात्र सध्या एक असा प्रकार समोर आला आहे जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

चक्क ऑपरेशन दरम्यान एक महिला रडली असल्याने हॉस्पिटलने त्या महिलेचे रडण्याचेही पैसे घेतले असल्याचा प्रकार घडला असून या महिलेने बिलाचा फोटो व्हायरल केला असून सध्या सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार अमेरिकेतील आहे.

महिलेने सांगितल्यानुसार हा संपूर्ण प्रकार मिज नावाच्या एका महिलेसोबत घडला आहे. हा विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटरवर तिने रुग्णालयाच्या बिलाचा फोटो पोस्ट केला आहे.

तिने रुग्णालायने आपल्याकडून रडण्याचेही पैसे वसूल केले, असा दावा केला आहे. मिज नावाची महिला चेहऱ्यावरील तीळ काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी गेली होती. ही शस्त्रक्रिया सुरू असताना ती घाबरून गेली होती. व यावेळी ती यात रडू लागली.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या हाती सोपवलेलं बिल जेव्हा तिने पाहिलं तेव्हा तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. कारण त्या बिलावर रडण्याचेही पैसे लावण्यात आले होते. बिलामध्ये डॉक्टर आणि शस्त्रक्रियेच्या व्यतिरिक्त ‘ब्रीफ इमोशन’ नावाने ११ डॉलर म्हणजेच ८१५ रूपये आकारले आहेत.

आपण सर्जरीवेळी रडल्याने हे पैसे आकारले असा दावा या महिलेने केला आहे. व आता रुग्णालयाच्या या विचित्र बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: