महाविकास आघाडीतील मंत्री बच्चू कडूंची भाजपशी युती; प्रकरण अजितदादा व ठाकरेंकडे

October 06, 2021 , 0 Comments

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जागांसाठी आज निवडणुका पार पडत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.

ओबीसी आरक्षण अतिरिक्त ठरल्यामुळे ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रीक्त जागांसाठी या निवडणुका घेण्यात येत आहेत. आज सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली.

पालक मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पहिल्यांदाच अकोला जिल्हापरिषद निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी भाजप सोबत आघाडी करू नये यासाठी अकोलाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांकडे बच्चू कडू यांना समन्स बजावण्याची मागणी केली.

कुटासा येथे मतदान करून आल्यावर मिटकरी बोलत होते. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपसोबत जर पालकमंत्री बच्चू कडू युती करत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांना समज द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

“महाविकास आघाडी सरकारमधील ते घटकपक्षातले बच्चू कडू हे राज्यमंत्री पदावर आहेत ते शिवसेनेच्या कोट्यातून…आणि शिवसेनेच्या पाठीत खंजर खोपसणाऱ्या भारतीय जनता पार्टीसोबतच पालकमंत्री गटबंधन करत असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. पालकमंत्र्यांची प्रतिमा यामुळे मलिन होतच आहे. जर बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष भारतीय जनता पक्षासोबत जर जात असेल , तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अजित दादा पवार यांनी पालकमंत्री बच्चू कडुंना समज द्यावी” अश्या स्पष्ट शब्दात अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

निवडणुकीचा निकाल लागल्यावर आमदार बच्चू कडू शिवसेनेसोबत राहून खाल्लेल्या मिठाला जागणार की बंडाचे अस्त्र उगारून भाजपच्या गोठ्यात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

महत्वाच्या बातम्या
ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या मुनमुन धमेचाचे काय आहे बॉलिवूड कनेक्शन? सेलिब्रिटींसोबतचे फोटो होताय व्हायरल
अविष्कार – स्नेहा वाघ पुन्हा एकत्र येणार; बिगबाॅसमध्ये दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारत…
आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणी निलेश राणेंचे नाव न घेता आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
हिने वर पण काही घातलं असतं, तर बरं झालं असतं; टॉपलेस व्हिडिओमुळे मोहम्मद शमीची बायको झाली ट्रोल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: