भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? शिवसेना आमदाराचा सवाल

October 01, 2021 , 0 Comments

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस व शिवसेना या पक्षातील नेत्यांचे एकमेकांसोबत अनेक वेळा मतभेद होताना पाहायला मिळत आहेत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यामध्ये देखील चांगलीच जुंपली आहे.

सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे हेदेखील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते.

माझ्यातील व छगन भुजबळ यांच्यातील वाद म्हणजे महाविकास आघाडीतील वाद नाही. दहा कोटी निधी आला होता. त्यामधील आठ कोटी छगन भुजबळ यांनी ठेकेदारांना दिले. मात्र माझ्या मतदारसंघाला दोन कोटी रुपये दिले. नियोजन निधी वाटपाचा अधिकार छगन भुजबळ यांना नाही. अधिकार नसतानादेखील त्यांनी निधी वाटप केला. त्यांचं पालकमंत्रीपद काढून घेतलं जावं. असे सुहास कांदे हे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.

पंचवीस वर्षांमध्ये 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाल शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित करत ते म्हणाले छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केला आहे. माझ्याजवळ तसे पुरावे देखील आहेत. मी ते पुरावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवार यांना सादर केले आहेत. असे देखील आमदार सुहास कांदे म्हणाले.

सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी भुजबळांवर निधी विकल्याचा आरोप केला आहे. माझ्याकडे भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे असल्याचा दावा देखील शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

दरम्यान मला छोटा राजनच्या पुतण्याने फोनवरून धमकी दिल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले होते. छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने आमदार सुहास कांदे यांना न्यायालयातील याचिका मागे घ्या. नाहीतर तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही, अशी धमकी फोनवरून दिली होती. आमदार सुहास कांदे यांनी याबाबत पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: