खड्ड्यांमुळे गेली नोकरी! एकनाथ शिंदेंनी झापल्यानंतर चार इंजीनियर तडकाफडकी निलंबीत

September 26, 2021 , 0 Comments

सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे, खराब रस्त्यांमुळे आणि खड्डे असलेल्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. अनेकदा खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्डा किती खोल आहे. याचा अंदाज येत नाही, त्यामुळे रस्ते अपघात होतात.

अशातच ठाणेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यांची पाहणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याच खड्ड्यांमुळे संपुर्ण ठाणे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे आणि त्यामुळे याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.

आता या रस्त्यांची पाहणी करताना एवढ्या ८ दिवसात सर्व रस्ते दुरुस्त होतील, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यावेळी ते अभियंतांवरही आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी चार अभियंतांना निलंबित केले आहे.

ठाण्यातील कार्यकारी अभियंता चेतन पाटील, प्रकाश खडतरे आणि कनिष्ठ अभियंता संदीप सावंत तसेच संदीप गायकवाड यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनी तसेच घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गासह मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि कळवा-विटावा मार्गावर शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली होती.

शुक्रवारी दुपारच्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत मिळून रस्ते पाहणी दौरा केला आहे. या दौऱ्याआधी शिंदे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली होती. पावसाळ्याआधी रस्त्यांची डागडुजी करुनही पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात याचा अर्थ कामाची गुणवत्ता तपासली जात नाही.

त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील हे रस्ते असतील, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा. संबंधित ठेकेदारांवर कारवाई करा. गरज पडल्यास काळ्या यादीत टाका आणि कठोर कारवाई करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: तृत्पी देसाई म्हणाल्या, माझ्याशी नीट बोलायचं; सोनालीने दिले ‘हे’ सडेतोड उत्तर, देसाईंची केली बोलती बंद
Bank Holidays: तुमची बँकेतील कामं लवकरच पूर्ण करा; पुढील महिन्यात 21 दिवस बंद राहणार बँका
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाची पाकिस्तानसाठी येवढी तडफड का होतेय? वाचा खरं कारण


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: