‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘या’ कलाकाराचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

September 26, 2021 , 0 Comments

मुंबई। गेले वर्ष दीड वर्ष कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्याप्रमाणे कोरोनाचा फटका नागरिकांना बसला आहे त्याचप्रमाणे त्याचा परिणाम हा उद्योग क्षेत्रात तसेच व्यवसाय व नोकऱ्यांवर देखील झाला आहे.

कोरोनाच्या लाटा एकामागोमाग एक येत असल्याने सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आले व त्यामुळे याचा फटका मनोरंजन क्षेत्राला देखील बसला आहे. कोरोनामुळे शुटिंग बंद करण्यात आल्या होत्या.

आता अनलॉक केल्यानंतर काही नियम शिथिल करत मालिकांच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. दरम्यान ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने जरी आता निरोप घेतला असला तरी. कोरोनाकाळात या मालिकेच्या शुटिंगलाही सुरूवात झाली होती.

शुटिंग दरम्यान सरकारने दिलेल्या सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात होते. मात्र याच मालिकेतील एका व्यक्तीचं निधन झालं आहे. या मालिकेतील अभिनेता विजय वीर यांचे निधन झाल्याचे समोर येत आहे.

विजय वीर हे सहकलाकार म्हणून मालिकेत काम करत होते. या मालिकेतील गुलमोहर सोसायटीतील वॉचमनची भूमिका ते साकारत होते. २० जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

या मालिकेव्यतिरिक्त विजय वीर यांनी नऱ्या आणि माधव अशा काही मराठी, हिंदी सिनेमात देखील काम केलं होतं. मात्र विजय यांच्या मृत्यूनंतर मालिकेतील कलाकार व चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: