बिग बॉसमध्ये सोनाली पाटील आणि तृप्ती देसाईमध्ये राडा! सोनाली म्हणाली, तृप्ती देसाई एक नंबरची…

September 27, 2021 , 0 Comments

मुंबई । सर्वांचा लोकप्रिय शो असलेला बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व पुन्हा सुरु झाले आहे. यामुळे सर्व प्रेक्षकांचे याकडे लक्ष आहे. यामध्ये मीरा जगन्नाथकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांना तिचे भांडण आवडत आहे. मात्र दुसऱ्या दिवशी कोल्हापुरी सोनाली पाटीलबद्दल बोलताना तिच्या हटके अंदाजावरून मीरा आणि गायत्री दातार या दोघीनी तिला टार्गेट केले.

असे असताना सोनाली पाटीलचा खेळ तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला. सुरुवातीलाच बिग बॉसच्या घरात गटबाजी सुरु असलेली बघायला मिळत आहे. समाजसेविका तृप्ती देसाई यांनी मात्र, आपल्या कामाची बढाई करण्याची सुरु केली आहे. त्या सहभागी होण्यापासूनच चर्चेत आहेत.

तसेच कीर्तनकार शिवलीला पाटील आणि तृप्ती देसाई या दोघींमध्ये कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुद्द्यावरून वाद जुंपलेला बघायला मिळाला. यामुळे त्या दोघी चर्चेत आल्या आहेत. सोनाली पाटील आपले मत मांडले असल्याचे बघायला मिळाले होते. तेव्हापासूनच, तृप्ती देसाई, सोनाली पाटीलच्या विरोधात बोलताना मिळाले.

उत्कर्ष शिंदे नवीन कॅप्टन बनला आहे. त्याने शिवलीला आणि सोनाली या दोघीना किचन मधले काम दिले. यावेळी चपात्या करताना तृप्ती देसाई तिथे आली. तृप्ती देसाईने शिवलीला यांना, ओरडायला सुरुवात केली आणि तुम्हाला महिला असूनही इतकं समजत नाही का, असे म्हणून पुन्हा महिला-पुरुष हा वाद सुरु करण्याचा प्रयत्न केला.

सोनालीने विषय संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र विषय वाढतच गेला आहे. पुरुष इथे किचनमध्ये काम करत असताना त्यांनी अशी चूक नाही केली. मग महिला असून अशी चूक तुम्ही केलीच कशी. अश्या पुऱ्या असतात, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

यावर सोनाली म्हणाली, आम्ही बोलत आहे ना की, झालं चुकून. तुम्ही सारखं सारखं बोलून काय होणार आहे. आता अशी चपाती तुम्हाला खायची नसेल तर काय करू? दुसरं काही देऊ का? फक्त महिला महिला करत भांडायक पहिला नंबर, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे येथे देखील महिला पुरुष असा वाद होत असल्याचे दिसून येत आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: