गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होतो तर महाराष्ट्राचा का नाही?

September 27, 2021 , 0 Comments

मुंबई । राज्यातील राजकारणात रोज अनेक गोष्टी घडत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत रोज अनेक वक्तव्य करून चर्चेत येत आहेत. आता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेल्यानंतर एक मोठे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी गेले आहेत.

यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. यावेळी संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे, ते म्हणाले, देशाने शिवसेनेचे ताकद पाहिली आहे. गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही. असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत आता पंतप्रधान पदासाठी देखील दावा केला आहे.

तुमच्या नेत्यांसोबत आज जेवायला होते तुम्ही कुठे होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मला विचारले उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. मी म्हटलं आमची सत्ता येणार म्हणून गेले असही राऊत यांनी यावेळी सांगितले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत चर्चा सुरू झाली आहे.

तसेच पुण्यात आपली सत्ता कधी येणार? असा प्रश्नही त्यांनी शिवसैनिकांना विचारला आहे. यामुळे पुण्यात महानगरपालिका निवडणूकीत शिवसेना देखील ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून देशातील पहिल्या पाच मध्ये आले. मला राहुल गांधी यांनी विचारले शिवसेनेच्या यशाचा रहस्य काय तर म्हटले, आमची भाषा टीका नाही, तुम्हाला पण नेता होण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, आम्ही कधीही मागे हटत नाही, फटे लेकिन हाटे नही, असेही ते म्हणाले.

पुढील तीन वर्ष सुध्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील. ते दिल्लीत गेल्याने लोक देव पाण्यात घालून बसले आहेत. ते मुंबईत परत आले, अमित शहा ना पण भेटले, शासकीय काम करून परतले. संजय राऊत हे पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: