२ ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी घेणार; संत परमहंसाच्या घोषणेने देशात खळबळ

September 27, 2021 , 0 Comments

अयोध्या । अयोध्यामधून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील संत परमहंस यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या तपस्वी छावणीमध्ये सनातन धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात संत आले होते. यावेळी संत परमहंस यांनी घोषणा केली आहे. यामुळे सगळीकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

१ ऑक्टोबर भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यावर चर्चा होईल. केंद्र सरकारने काही निर्णय घेतला नाही तर २ ऑक्टोबर रोजी ते शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतील. अशी घोषणा त्यांनी केली आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत संत परमहंस दास यांनी सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी सर्व संघटनांचे लोक हिंदू सनातन धर्मसंसदेचे आयोजन करतील, आमचे म्हणणे ऐकले गेले नाही तर मी शरयू नदीत जलसमाधी घेईन, मी समाधी घेतल्यानंतर कदाचित माझ्या श्रद्धांजलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला हिंदूराष्ट्र घोषित करतील, असेही ते म्हणाले.

काश्मीरमध्ये धर्माच्या आधारावर घोषणा होतात. जर हिंदू राष्ट्र घोषित केले नाही तर हिंदू अल्पसंख्याक होऊन जाईल. त्यापासून वाचण्यासाठी हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. हिंदू राष्ट्र घोषित झाल्यावरही दुसऱ्यांना त्रास होणार नाही, असेही ते म्हणाले.

जर हिंदू वाचला नाही तर काहीच वाचणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. संत परमहंस यांनी हिंदूराष्ट्राबाबत काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर आत्मदाह करण्याची घोषणा केली होती.

असे असताना मोठा गोंधळ उडाला होता, चितेवर बसत असतानाच तिथे पोलीस दाखल झाले होते. त्यांनी त्यांची समजूत घालून त्यांना थांबवले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा ही घोषणा केल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे आता हालचालींना वेग आला आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: