शाहिद आफ्रिदीने पुन्हा खाल्ली माती, भारतावर राग व्यक्त करत म्हणाला, भारत आमच्या..

September 27, 2021 , 0 Comments

पाकिस्तान क्रिकेट आणि पाकिस्तानी खेळाडू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकताच सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा रद्द केला. न्यूझीलंडचा संघ १८ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. यामुळे यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

न्यूझीलंड टीमला पाकिस्तानात धोका असल्याची माहिती सरकारकडून मिळाली होती. यानंतर दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा मोठा दौरा होता. यामध्ये ३ वनडे, ५ टी 20 सामन्यांची मालिका खेळणार होती. असे असताना एकही सामना झाला नाही. हा दौरा रद्द करण्यात आला.

यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारतावर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, खेळाडूंना जो मेल पाठवण्यात आला होता तो भारतातून करण्यात आला होता, कारण काश्मिर प्रीमयर लीगमुळे त्यांच्या भावना दुखावल्या होत्या, म्हणून हा वचपा काढलाय का?

आम्ही पण एक देश आहोत, आणि यासाठी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील. आम्हाला ही काही मान सन्मान आहे. एक देश आमच्या मागे लागला आहे. बाकीच्या देशांनी ती चूक करायला नको, जी चूक हा देश करतोय. सर्व राष्ट्र हे सुशिक्षित आहेत. त्यांनी भारतासारखे करायला नको, असेही त्याने म्हटले आहे.

आमच्या क्रिकेट बोर्डाने क्रिकेट खेळण्यासाठी समजूत घातली होती, जेणेकरुन पाकिस्तानात पुन्हा क्रिकेटला सुरुवात होईल. यानंतर पुन्हा एकदा नव्याने पाकिस्तानात क्रिकेटला सुरुवात झाली. अनेक मोठे सामने देखील झाले. हा आमचा मोठा विजय होता. यामुळे सगळं व्यवस्थित झाले होते.

कोणताही क्रिकेट दौरा सूरक्षेचे निकष पूर्ण झाल्याशिवाय होत नाही, असेही आफ्रिदी म्हणाला. आता मात्र स्पर्धा रद्द झाली आहे. यामुळे आता पुन्हा कधी पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने होणार की नाहीत असा प्रश्न पाकिस्तानी खेळाडूंना पडला आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: