अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयकडून अटक; देशमुख कुटुंबियांकडून अपहरणाचा आरोप

September 02, 2021 , 0 Comments

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सध्या ईडीची कारवाई सुरु आहे. असे असताना आता अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. वरळी येथील सी लिंक परिसरातून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

गौरव चतुर्वेदी यांच्यासोबत अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. एकूण १० जणांच्या टीमने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. आता या प्रकरणी देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांचे अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अनिल देशमुख यांच्या प्रकरणात आधी कधीही गौरव चतुर्वेदी यांचे नाव आले नव्हते. पण अचानकपणे त्यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

गौरव चतुर्वेदी हे देशमुख यांच्या वरळी येथील सुखदा इमारत येथे आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर वरळी परीसरात सी लिंकजवळ त्यांची गाडी थांबवण्यात आली. त्यावेळी चतुर्वेदी यांच्यासोबत अनिल देशमुखांचे वकिलही होते. दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि त्यांच्या वकिलांना कोणतीही नोटीस न बजावता थेट ताब्यात घेण्यात आले आहे, असे म्हणत काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहे. हम कहे सो कायदा असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करुन टाकावे. जाहीर निषेध!, असे ट्विट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

..तेव्हा विवेक ओबेरॉयला समोर पाहून उडाला होता ऐश्वर्या रायच्या तोंडाचा रंग, अशी झाली होती अवस्था
ढोंगी समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेला खंडणी मागितल्या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी केली अटक
पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर, म्हणाले, ज्यांच्या जीवावर मुख्यमंत्री झाला, त्यांना…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: