coronavirus in maharashtra latest udates करोना: राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट; मुंबईतील सक्रिय रुग्णही झाले कमी

August 09, 2021 0 Comments

मुंबई: आज राज्यातील करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून गेल्या २४ तासांत एकूण ५ हजार ५०८ नव्या बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ४ हजार ८९५ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १५१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात झालेल्या १५१ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही मृत्यूदर मात्र गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ४४ हजार ३८८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७१ टक्के इतके झाले आहे. पाहा, कोणत्या जिल्ह्यात किती सक्रिय रुग्ण! राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७१ हजार ५१० इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ४५८ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ७ हजार ३७० इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ३०९ इतकी आहे. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ६ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार १३० सक्रिय रुग्ण आहेत. तर सोलापुरात ५ हजार ९९७ इतके रुग्ण आहेत. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत ४६४५ सक्रिय रुग्ण मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ही सख्या ४ हजार ६४५ इतकी आहे. तर, रायगडमध्ये २ हजार ०५३, रत्नागिरीत १ हजार ७९७, सिंधुदुर्गात १ हजार ७९७, बीडमध्ये १ हजार ८२७, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ०३९ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- धुळ्यात फक्त ३ सक्रिय रुग्ण या बरोबरच, औरंगाबादमध्ये ६५२, नांदेडमध्ये ही संख्या ४४७ इतकी आहे. जळगावमध्ये ३२४,नागपूर जिल्ह्यात ही संख्या २५२ इतकी झाली आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ११८ इतकी झाली आहे. तसेच अमरावतीत ही संख्या ८२ वर खाली आली आहे. नंदुरबारमध्ये ही संख्या ८ इतकी असून धुळ्यात ही संख्या ३ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या धुळे जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३ वर आली आहे. क्लिक करा आणि वाचा- ४,२२,९९६ व्यक्ती होम क्वारंटाइन आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९५ लाख ६८ हजार ५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ५३ हजार ३२८ (१२.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख २२ हजार ९९६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: