कोविड बॅचच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये, ‘ती’ जाहिरात व्हायरल होताच बँकेचं स्पष्टीकरण

August 05, 2021 , 0 Comments

मुंबई। सध्या कोविड काळात कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असल्याने सर्व वर्गाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या व त्यांवर त्यांना उत्तीर्ण करण्यात आलं. मात्र याच उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले विद्यार्थी आता नोकरीच्या शोधात आहेत.

अशातच कोरोना काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनबद्दल बाहेर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यात अडचण निर्माण होत आहे. अशातच सध्या एक जाहिरात व्हायरल होत आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांनमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून या जाहिरातीवर प्रचंड टीका केली जात आहे.

या जाहिरातीत स्पष्ट लिहिले आहे की,2021 कोविड बॅचमध्ये पास झालेल्या विद्यार्थीनी या रिक्त जागेसाठी अर्ज करू नये. ही जाहिरात देणारी बँक देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. शेवटी या बँकेकडून या बाबत स्पष्टीकरण देण्यात आले.

संबंधित जाहिरात एचडीएफसी बँकेच्या तमिळनाडूतील मदुराई शाखेनं काढली होती. ज्यामध्ये 2021 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये, अशी अट ठेवण्यात आली होती. बँकेनं आपली चूक मान्य केली आहे. तसेच जाहिरात टाईप करत असताना, त्यामध्ये चूक झाल्याचं म्हटलं आहे.

बँकेनं आता एक वेगळी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये 2021 साली पास झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात, असंही त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे. मात्र ज्यावेळी ही जाहिरात प्रसिद्ध झाली त्यावेळी ती काही मिनिटांमध्येच व्हायरल झाली व त्यामुळे बँकेला ट्रोल केलं जात आहे.

आधीच कोविड काळात शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात या जाहिरातीमुळे सगळीकडे गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या
इतिहास घडला! तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय पुरूष हाॅकी संघाला ऑलिम्पीक पदक
शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्राणज्योत मालवली
‘१०० कोटींची वसुली करून स्वतःचे खिसे भरता मग या गणेश मंडळांनी काय करावे?’
छत्रपती शिवरायांनी आपल्यातील जाणकार मंडळी जपानमध्ये का पाठवली नाही?- बाबासाहेब पुरंदरे


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: