अरे वा! टाटा मोटर्स लाँच करणारा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किती असेल किंमत

August 26, 2021 , 0 Comments

जगभरासोबतच आता भारतातही इलेक्ट्रीक कारची मागणी वाढत चालली आहे. पेट्रोल डिजेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देत आहे. पण इलेक्ट्रीक कारची किंमत अजूनही भारतीयांसाठी एक समस्या बनलेली आहे, असे असतानाच टाटा मोटर्सने आता सर्वास्त स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणा असल्याचे म्हटले आहे.

टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३१ ऑगस्टला टाटा टिगॉर इलेक्ट्रीक कार लाँच होणार असल्याचे म्हटले आहे. लाँचिंगच्या आधीच या कारबाबत लोकांमध्ये खुप उत्सुकता आहे. कारण ही कार टाटा मोटर्सच्या बेस्ट सेलिंग कारमधील एक कार आहे.
ही कार डिलरशिपपर्यंत पोहचली असून या कारच्या काही फिचर्स डिटेल्सही समोर आल्या आहे. त्यामध्ये न्यु टाटा टिगॉर ईवी सिंगल चार्जमध्ये ३५० किलोमीटर चालते. या कारमध्ये झिप्ट्रोन ईवी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे.

टाटा मोटर्सने या कारचा एक टिझर लाँच केला आहे. ज्यामध्ये या कारच्या लुकबद्दल समजते. तसेच व्हिडिओमध्ये कारच्या फिचर्सबद्दलही सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट सेलिंग एसयुव्ही टाटा नेक्सॉन ईवीसारखी यातही झिप्ट्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

झिप्ट्रोन पावर्ड इलेक्ट्रिक व्हेईकलबद्दल टाटा मोटर्सने दावा केला आहे की, याची बॅटरी रेंज २५० किलोमीटरची असती. तसेच आता नवीन पावरट्रेनमध्ये बॅटरीची रेंज जास्त असणार असल्याचे सांगितले जात आहे. या कारची किंमत १० ते १२ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

टाटाच्या इलेक्ट्रीक कारमध्ये ५५ केडब्ल्युची इलेक्ट्रिक मोटर असेल आणि २६ केडब्ल्युची लिथियम आयर्न बॅटरी पॅक असणार आहे. जे की ७४ बीएचपीपर्यंतची पावर आणि १७० एनएमपर्यंतचा टॉर्क जनरेट करेल. असे म्हटले जात आहे की, ५.९ सेकंदात ६० किलोमीटर प्रतितासाचा वेग धरु शकते. या कारची बॅटरी ८ वर्ष किंवा १,६०,००० किलोमीटरपर्यंत चालेल असाही दावा टाटा मोटर्सने केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

२४ तासांच्या आत अनिल परबांवर गुन्हा दाखल करा, नाहीतर… ; भाजप आमदाराचा रत्नागिरी पोलिसांना इशारा
केवळ ७८ धावांमध्ये भारतीय संघ तंबूत, इंग्लंडच्या संघासमोर भारतीय संघाची केविलवाणी अवस्था
VIDEO: हरयाणवी डान्सर कोमल चौधरीच्या डान्सने प्रेक्षक घामाघून; कोमलने कुर्ता उचलला अन्…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: